शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

“राज्यात भाडोत्री सैन्यच राज्य करतंय”; संजय राऊतांकडून शिंदे गटाची वॅग्नर लष्कराशी तुलना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2023 13:48 IST

Sanjay Raut News: औरंगाजेबाची कबर उखडून टाकू, असे हेच फडणवीस-शिंदे म्हणाले होते. आम्ही जेसीबी घेऊन देतो, उखडून टाका, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले.

Sanjay Raut News: गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या तीन दिवसांनंतर उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस या दोन बड्या नेत्यांमध्ये शवासनावरून शनिवारी वाक्युद्ध रंगले. यातच आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाची तुलना थेट रशियातील वॅग्नर लष्कराशी करत, महाराष्ट्रात भाडोत्री सैन्यच राज्य करत आहे, अशी घणाघाती टीका केली. 

मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, राज्यकर्ते ज्या पद्धतीने काम करत आहे, ही हुकूमशाही आणि दहशतवादाच्या पुढील पायरी आहे. पुतिन हा हुकूमशाह आहे. पुतिनने वॅग्नर हे भाडोत्री सैन्य नेमले होते. जेव्हा भाडोत्री सैन्यावर राज्य करण्याची वेळ येते, तेव्हा ते उलटले जाते. महाराष्ट्रात भाडोत्री सैन्यच राज्य करत आहे. हे भाडोत्री सैन्यच तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही, अशी सडकून टीका संजय राऊत यांनी केली. तसेच वॅग्नर लष्कराप्रमाणे शिंदेंचे भाडोत्री सैन्य भाजपावर उलटणार आहे. हे कोणाचे नसतात, या शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.

आम्ही जेसीबी घेऊन देतो, उखडून टाका

प्रकाश आंबेडकरांनी औरंगाजेबाच्या कबरीवर जाऊन दर्शन घेतले, त्यावर प्रतिक्रिया दिली नाही, असे विचारले असता, प्रकाश आंबेडकरांशी आमची युती झाली नाही. आम्ही यावर बोललो आहे. पण, फडणवीस यावर बोलू शकले नाहीत. अन्य लोक कबरीवर गेल्यावर फडणवीसांनी किती मोठा फणा काढला होता. आता हा फणा वेटोळे घालून बसला आहे का? अशी विचारणा करत, हेच फडणवीस आणि शिंदे औरंगाजेबाची कबर उखडून टाकू म्हणाले होते. आम्ही जेसीबी घेऊन देतो, उखडून टाका, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले. 

दरम्यान, स्वार्थासाठी पाटण्यात लोक एकत्र आली आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. यावर बोलताना, हे परमार्थासाठी एकत्र आलेत का? हा त्यांचा अध्यात्म आणि परमार्थ असेल, तर सांगा. परमार्थाची व्याख्या वारकऱ्यांकडून समजून घ्यावी लागेल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस