नवी दिल्ली : केंद्र सरकारने शनिवारी अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) हंगामी संचालक म्हणून संजय कुमार मिश्रा यांची नेमणूक केली. ही नेमणूक तीन महिन्यांसाठी आहे.संजय कुमार मिश्रा भारतीय महसूल सेवेचे प्राप्तिकर केडरचे १९८६ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. मावळते संचालक कर्नाल सिंग यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्तीविषयक समितीने मिश्रा यांच्या नावाला हंगामी संचालकपदासाठी मंजुरी दिली. मिश्रा यांना ‘ईडी’चे प्रधान मुख्य संचालक नेमण्यात आले असून, त्यांच्याकडे तीन महिन्यांसाठी संचालकपदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.
संजय कुमार मिश्रा झाले ‘ईडी’चे हंगामी संचालक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 05:23 IST