शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

संघानं शिवराज सिंह चौहानांना दिली होती बहुमत न मिळण्याची पूर्वकल्पना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 15:18 IST

गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपाला मध्य प्रदेशमध्ये पराभव पत्करावा लागला.

ठळक मुद्दे15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपाला मध्य प्रदेशमध्ये पराभव पत्करावा लागलापराभवाची संघानंही मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानांना पूर्वकल्पना दिली होती.तुम्ही जनतेत लोकप्रिय असूनही तुम्हाला बहुमत मिळणं अवघड आहे

भोपाळ- गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपाला मध्य प्रदेशमध्ये पराभव पत्करावा लागला. या पराभवाची संघानंही मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानांना पूर्वकल्पना दिली होती. मध्य प्रदेशात गेल्या काही दिवसांपूर्वी निवडणूक प्रचारादरम्यान शिवराज सिंह चौहान भोपाळमध्ये अर्ध्या रात्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात पोहोचले होते. जिथे संघाचे महत्त्वाचे नेते त्यांची वाट पाहत होते. त्यावेळी चौहान यांनी जवळपास दोन तास संघाच्या नेत्यांबरोबर चर्चा केली.तेव्हा संघानं चौहान यांना सांगितलं की, तुम्ही जनतेत अजूनही लोकप्रिय आहेत, परंतु तुम्हाला बहुमत मिळणं अवघड आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर संघाच्या नेत्यानं ही माहिती दिली आहे. सद्यस्थितीत विद्यमान असलेल्या आमदारांना पुन्हा तिकीट दिल्यास पराभव होऊ शकतो. कृषीपासून शिक्षण क्षेत्रापर्यंतच्या आमच्या नीती आणि कार्यक्रमांचा चौहान हे नेहमीच एक भाग राहिले आहेत, असंही या नेत्यानं सांगितलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये संघ परिवार आणि चौहान यांच्यामध्ये बऱ्याच बैठका झाल्या.2014लाही संघ प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेऊन माझा आणि माझ्या कुटुंबीयांचा त्या घोटाळ्यांशी संबंध नसल्याचं शिवराज सिंह चौहानांनी सांगितलं होतं. मंदसौरमध्ये शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांनी संघाचीही मदत मागितली होती. तसेच मध्य प्रदेशातील विविध सरकारी विभागातही संघाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात भरती करण्यात आलेली आहे. राजस्थान आणि छत्तीसगड काँग्रेसनं जिंकलं. परंतु मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची अटीतटीची लढत झाली होती.   

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018Madhya Pradeshमध्य प्रदेश