शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

सनातन प्रभातची मजल... म्हणे पोलिसांनाच शिक्षा देऊ

By admin | Updated: September 20, 2015 18:04 IST

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी समीर गायकवाडला अटक झाल्यानंतर आता सनातन प्रभातने थेट पोलिसांनाच लक्ष्य केले आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २० - कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी समीर गायकवाडला अटक झाल्यानंतर आता सनातन प्रभातने थेट पोलिसांनाच लक्ष्य केले आहे. समीर गायकवाडला अटक करणा-या पोलिसांची नावे सनातनने नोंद केली आहेत,  साधकांचा छळ करणा-या पोलिसांना हिंदू राष्ट्रात कठोर साधनेची शिक्षा करु' असा धमकीवजा इशाराच सनातन प्रभातने दिला आहे. 
सनातन संस्थेचा कार्यकर्ता समीर गायकवाडला कॉ. गोविंद पानसरेंच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सनातनशी संबंधीत सनातन प्रभातमध्ये एक लेख लिहीण्यात आला आहे. या लेखात पानसरे हत्येेच्या तपासावरुन पोलिसांनाच लक्ष्य करण्यात आले. पोलिसांची कायदाबाह्य कृती आणि सनातन द्रोह सुरु असून पोलिसांनी या अटकेचा बनाव रचल्याचे स्पष्ट झाले आहे असा दावा या लेखात करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनाच कठोर साधनेची 'शिक्षा' दिली जाईल असेही लेखात म्हटले आहे. सनातन प्रभातमधून थेट पोलिसांनाच शिक्षेची धमकी दिल्याने सर्वच स्तरातून या लेखाचा विरोध होत आहे.