दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या लेकीचे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये लग्न पार पडले. हर्षिता हिने गुरुवारी संभव जैन याच्यासोबत सात फेरे घेतले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत केजरीवाल यांनी सरकारी बंगल्यावर कसे करोडो रुपये खर्च केले याचा बोभाटा भाजपने केला होता. यामुळे त्यांची इमेज खराब झाली होती. केजरीवाल यांच्या लेकीचे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये लग्न झाले आहे.
गुरुवारी रात्री हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी संगीत सेरेमनीला पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान देखील उपस्थित होते. मान हे त्यांच्या पत्नीसोबत डान्स करताना दिसले होते. सामान्य व्यक्तीच्या लेकीचा विवाहसोहळा असला तरी काही खास लोकांनाच या विवाहसोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते. या लग्नाचे काही फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. २० एप्रिलला रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे.
हर्षिता केजरीवाल हिने आयआयटीमधून पदवी घेतलेली आहे. तसेच तिचा पती संभव यानेही दिल्ली आयआयटीमधून शिक्षण घेतलेले आहेत. या दोघांनी काही महिन्यांपूर्वीच एक स्टार्टअप सुरु केले आहे. संभवने केजरीवालांच्या प्रचार रॅलीमध्येही उपस्थिती दर्शविली होती.