शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कॉल आला अन् सांगितले, "तुम्ही अमनचे वडील आहात? तुमचा मुलगा देशासाठी शहीद झाला"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 19:53 IST

India China FaceOff : भारत आणि चीनमध्ये सोमवारी दुपारपासून सुरु झालेल्या हिंसक धुमश्चक्रीमध्ये चीनचे 43 हून सैनिक मारले गेले आहेत. तर भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत.

ठळक मुद्देनोव्हेंबर २०१४ मध्ये अमन कुमार सिंह हे बिहार रेजिमेंटमध्ये दाखल झाले होते. गेल्या 3 महिन्यांपासून अमन कुमार सिंह लेह-लडाखमधील चीन सीमेजवळ तैनात होते.

समस्तीपूर : लडाखच्या गलवान खोऱ्यात एलएसी सीमेववर भारत-चीन सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले. या शहीद जवानांमध्ये 16 बिहार रेजिमेंटचे जवान अमन कुमार सिंह सुद्धा होते. अमन कुमार सिंह हे समस्तीपूर जिल्ह्यातील मोहिउद्दीननगर ब्लॉकमधील सुलतानपूर पूर्व गावचे रहिवासी होते.

मंगळवारी रात्री नऊ वाजता मोबाईलवरून लडाख येथे आपल्या मुलाने देशासाठी बलिदान दिले, अशी माहिती शहीद अमन कुमार सिंह यांचे वडील सुधीर सिंह यांना कमांडिंग ऑफिसरने दिली. त्यानंतर त्यांच्या गावात शोककळा पसरली. नोव्हेंबर २०१४ मध्ये अमन कुमार सिंह हे बिहार रेजिमेंटमध्ये दाखल झाले होते. गेल्या 3 महिन्यांपासून ते लेह-लडाखमधील चीन सीमेजवळ तैनात होते.

गेल्या वर्षी पटनामध्ये अमन कुमार सिंह यांचे लग्न झाले होते. ते शहीद झाल्याची बातमी ऐकून त्यांच्या पत्नी अस्वस्थ झाल्या असून त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. अमन कुमार सिंह यांच्या आईलाही अश्रू अनावर झाले. त्या म्हणाल्या, "25-25 फेब्रुवारी ड्युटीवर गेला आणि तो म्हणाला होता की, तीन महिन्यानंतर सुट्टी भेटेल, पण कोरोनामुळे ट्रेन बंद झाली. लडाखमध्ये माझा मुलगा शहीद झाला. तीन महिन्यांत कशावरून काय झाले?"

रात्री दारात बसलो होतो, त्याचवेळी मोबाईलवर कॉल आला. त्यावेळी विचारले की तुम्ही अमनचे वडील आहात का?, यावर मी हो असे उत्तर दिले आणि त्यांच्याकडून मला सांगण्यात आले की, अमन देशासाठी शहीद झाला, असे अमन कुमार सिंह यांचे वडील सुधीर कुमार सिंह यांनी सांगितले. तसेच, ते म्हणाले, "माझा मुलगा देशासाठी शहीद झाला आहे, यापेक्षा अभिमानाची गोष्ट काय असू शकते?"

दरम्यान,  भारत आणि चीनमध्ये सोमवारी दुपारपासून सुरु झालेल्या हिंसक धुमश्चक्रीमध्ये चीनचे 43 हून सैनिक मारले गेले आहेत. तर भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. चीनच्या सैनिकांनी भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो त्यांच्याच अंगलट आला आहे.

आणखी बातम्या...

India China FaceOff : भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनला सुनावले, म्हणाले...

India Chine Faceoff : जवानांचे बलिदान देश कधीच विसरणार नाही - राजनाथ सिंह

दहा महिन्यांपूर्वी परिधान केली होती लष्कराची वर्दी, आता येणार तिरंग्यात लपेटलेले पार्थिव

ट्रेनमध्ये विना तिकीट प्रवास केल्यास शिक्षा होणार नाही? रेल्वे अनेक तरतुदी हटविण्याच्या तयारीत

21 जूनला होणार जगाचा अंत? जाणून घ्या, माया कॅलेंडरच्या दाव्यामागील सत्य...

टॅग्स :ladakhलडाखchinaचीनIndian Armyभारतीय जवान