शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ही आहे देशाची 'कोरोना वॉरिअर'; आज घरात वाजणार होती 'सनई', पण तिने देश सेवेला दिले प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 19:34 IST

पूजाचे वडील प्रकाश चंद सांगतात, आज वरात येणार होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनीच लग्न टाळण्याचा निर्णय घेतला. मुलीचा पेशाही असा आहे, की तीची सध्या आमच्यापेक्षाही रुग्णालयाला अधिक गरज आहे.

ठळक मुद्देज्या दिवशी लग्न होणार होते त्याच दिवशी रुग्णांची सेवा करत होती पूजापूजाचे वडील म्हणात, यापेक्षा अधिक पुण्याचे काम असूच शकत नाहीपूजाची आई म्हणते, मुलीचा अभिमान वाटतो

मंडी : कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार घातला आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण दिसत आहे. असे असतानाच वैद्यकीय कर्मचारी आणि पोलीस प्रशासन जीव तळहातावर घेऊन देशासाठी आपले योगदान देत आहेत. मंडी येथील नर्स पूजा हिने काहीसा असाच आदर्श तरुणांसमोर ठेवला आहे. 

हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील सुंदरनगर येथील नर्स पूजा हिचे आज (14 एप्रिल) लग्न होणार होते. मात्र, लॉकडाऊन आणि कर्फ्यूमुळे ते टाळावे लागले. मात्र, असे असतानाही ती संभवित कोरोना बाधितांची सेवा करतच होती. ज्या दिवशी तिचा विवाह होणार होता, अगदी त्या दिवशीही रुग्णालयात जाऊन तिने रुग्णांना सेवा दिली. ती येथील चंबा मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत आहे. 

ज्या दिवशी होणार होते लग्न त्याच दिवशी रुग्णांची सेवा करत होती पूजा -

पूजाचे वडील प्रकाश चंद सांगतात, आज वरात येणार होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनीच लग्न टाळण्याचा निर्णय घेतला. मुलीचा पेशाही असा आहे, की तीची सध्या आमच्यापेक्षाही रुग्णालयाला अधिक गरज आहे. देश संकटात आहे आणी पूजा यावेळी लोकांची मदत करत आहे. ती आजही रुग्णालयात गेली. यापेक्षा अधिक पुण्याचे काम असूच शकत नाही. थोडे वाईट नक्कीच वाटले. लग्नाची सर्व तयारी झाली होती. 

यासंदर्भात बोलताना पूजाची आई किरन शर्मा सांगतात, त्यांना त्यांच्या मुलीचा अभिमान वाटतो. त्यांची मुलगी, अशा गंभीर परिस्थितीतही लोकांची सेवा करत आहे. लग्न नंतरही होऊ शकते. पूजाला त्यांच्या होणाऱ्या सासरचाही पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांच्या आईंनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्नdoctorडॉक्टरMedicalवैद्यकीय