शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

अवैधरित्या शस्त्रं बाळगल्याप्रकरणी सलमानचा होणार आज 'फैसला'

By admin | Updated: January 18, 2017 08:48 IST

परवाना संपल्यानंतरही बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकणी अभिनेता सलमान खानविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज निर्णय सुनावण्यात येणार आहे.

ऑनलाइन लोकमत
जोधपूर, दि. १८ - अवैधरित्या शस्त्रास्त्रं बाळगल्याप्रकरणी अभिनेता सलमान खानविरोध दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर जोधपूर न्यायालय आज फैसला देणार आहे. कोर्ट काय निकाल सुनावतं, सलमानला शिक्षा होते की नाही याकडेच सर्वांचे लक्ष लागले असून सलमान खान जोधपूरमध्ये दाखल झाला असून आज तो सुनावणीसाठी कोर्टात उपस्थित राहणार आहे. 
'हम साथ साथ है' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, म्हणजेज १९९८ साली परवाना संपलेले शस्त्र बेकायदेशीररित्या वापरल्याबद्दल जोधपूर पोलिसांनी सलमान खान विरोधात शस्त्रास्त्र कायद्याखाली गुन्हा नोंदवला होता. गेल्या वर्षी 9 डिसेंबरपासून अंतिम सुनावणीला सुरुवात झाली होती. अखेर आज याप्रकरणी निर्णय सुनावण्यात येणार आहे. न्यायालयाने सलमानला दोषी ठरवल्यास त्याला सात वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. 
(18 जानेवारीला न्यायालय करणार सलमान खानचा 'फैसला')
  •  
 
 
नक्की काय आहे प्रकरण?
परवाना संपलेली शस्त्र बाळगल्याचा आरोप सलमानवर लावण्यात आला आहे. त्याच्याकडे असलेल्या दोन्ही शस्त्रांचा परवाना 22 सप्टेंबर 1998 रोजी संपला होता. मात्र त्याने या शस्त्रांनी 1 आणि 2 ऑक्टोबर 1998 रोजी काळवीटांची शिकार केली, असा आरोप याचिकाकर्त्याने केला होता.  दरम्यान सलमानची ही शस्त्र चोरी गेली अशी तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र तपासादरम्यान त्याच्या हॉटेलच्या रुममध्ये शस्त्र आढळली, असेही याचिकाकर्त्याने नमूद केले होते. शिवाय काळवीटांचा मृत्यू गोळी लागूनच झाल्याचा शवविच्छेदन अहवालही याचिकाकर्त्याने कोर्टासमोर सादर केला आहे.