शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

Salman Khan blackbuck poaching case updates : सलमान खान तुरुंगातून सुटला; मुंबईत पोहोचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2018 20:55 IST

50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सलमान खानला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

जोधपूर - 1998 सालच्या काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खानला आज 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.  मात्र उच्चनायालयातील अपीलासाठी शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण करुन सलमान संध्याकाळी सहा ते सात वाजेपर्यंत तुरुंगाबाहेर येईल. रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान तो बांद्रयातील आपल्या घरी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पोहोचू शकतो.

सलमानच्या जामिनाला सरकारी वकिलांनी तीव्र विरोध केला होता. सलमानला आतापर्यंत जेव्हा जेव्हा जामिन मिळाला त्यावेळी त्याने कधीही जामिनाच्या अटींचे उल्लंघन केलेले नाही त्यामुळे त्याला जामीन मंजूर करावा अशी विनंती त्याच्या वकिलांनी केली होती. अखेर न्यायाधीशांनी बचाव पक्षाचा युक्तिवाद मान्य करुन सलमानला जामीन मंजूर केला.

सलमानची सुटका होणार हे स्पष्ट होताच जोधपूर कोर्ट परिसर आणि मुंबईतील त्याच्या घराबाहेर एकच जल्लोष सुरु झाला. देशाच्या वेगवेगळया भागातून आलेले चाहते सलमानच्या घराबाहेर जमले आहेत.

ठळक घडामोडी

  • तुरुंगातून सुटल्यानंतर सलमान खान मुंबईत दाखल
  • सलमान खानला जामीन मंजूर करताना, कोर्टाने दोन अटी घातल्या आहेत. सलमानला 7 मे रोजी कोर्टात यावं लागेल, तसेच देश सोडण्यापूर्वी कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल.
  •  सात मे रोजी सलमान खानला हजेरीचे आदेश
  • सलमान खानला जामीन मंजूर
  • सलमान खानच्या जामीन अर्जावर दुपारी तीन वाजता निर्णय
  • सलमानची बहिन अलविरा कोर्टात दाखल
  • जोधपूर सत्र न्यायालयात जामिनावर सुनावणी पुर्ण, थोड्यात वेळात निर्णय
  • थोड्याच वेळात सलमान खानच्या जामिनावर निर्णय
  • दुपारी 2 वाजेपर्यंत सलमानच्या जामिनावर निर्णयाची शक्यता
  • सरकारी वकिल आणि सलमान खानच्या वकिलामध्ये कोर्ट रुममध्ये घमासान युक्तीवाद सुरु
  • दुपारच्या जेवनानंतर सलमान खानला जामिनावर निर्णयाची शक्यता
  • खटल्याशी संबधित कागदपत्रे सादर
  • सलमान खानच्या जामिनाला सरकारी वकिलाचा विरोध
  • न्यायाधीश रविंद्र कुमार जोशींसमोर दोन्ही पक्षाचा युक्तीवादाला सुरुवात
  • रविंद्र कुमार जोशीच करणार सलमानच्या खटल्याची सुनावणी
  • जामिनावर आज निर्णय येईल - सलमान खानचे वकिल
  • सलमान खानचा बॉडीगॉर्ड शेरा कोर्ट रुममध्ये दाखल
  • सलमान खानची बहिन अलविरा खान कोर्टात दाखल

 

  •  सत्र न्यायालयाचे न्यायाधीश रविंद्र कुमार जोशी जोधपुर न्यायालयात पोहोचले, सलमान खानच्या जामीन अर्जावर होणार सुनावणी.
  • सलमानच्या जामिनावर आज सुनावणी होण्याची शक्यता, न्यायाधिश रविंद्रकुमार जोशी कोर्टाकडे रवाना
टॅग्स :Salman Khanसलमान खानBlackbuck poaching caseकाळवीट शिकार प्रकरण