शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

काळवीट शिकार प्रकरण : सलमान खानला आज न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 09:57 IST

काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला शुक्रवारी जोधपूर न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ठळक मुद्देकाळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला शुक्रवारी जोधपूर न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा सत्र न्यायालयात आज या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सलमान जर आज न्यायालयात हजर राहीला नाही तर त्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

जोधपूर - काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला शुक्रवारी (27 सप्टेंबर) जोधपूर न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा सत्र न्यायालयात आज या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सलमान जर आज न्यायालयात हजर राहीला नाही तर त्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. न्यायालय त्याचा जामीन रद्द करू शकतं. 

अभिनेता सलमान खानलाकाळवीट शिकार प्रकरणीजोधपूर न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी दोषी ठरवले होते. याप्रकरणी त्याला पाच वर्षांचा तुरुंगवास आणि 10 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. 5 एप्रिल 2018  न्यायालयाने हा निकाल दिला होता. ही शिक्षा माफ व्हावी यासाठी सलमानच्या वकिलांकडून जोधपूर न्यायालयात निवेदन करण्यात आले असून सध्या ही केस सुरू आहे. पण सलमानची या खटल्यातून अद्याप तरी सुटका झालेली नाही. याउलट दिवसेंदिवस सलमानच्या अडचणीत वाढ होत आहे.

सलमान न्यायालयात हजर राहत नसल्याने न्यायाधीशांनी आता नाराजी व्यक्त केली आहे. मागील सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी या तारखेला सलमानच्या वकिलांना सांगितले होते की, सलमानने पुढील तारखेला न्यायालयात हजर राहावे अन्यथा त्याचा जामीन फेटाळला जाईल. गेल्या तारखेला देखील सलमानने न्यायालयात हजेरी लावली नव्हती, त्यावेळी सलमानला न्यायालयात हजर राहाण्याविषयी सलमानच्या वकिलांना सांगण्यात आले होते. पण तरीही सलमान या तारखेला देखील उपस्थित राहिला नसल्याने न्यायाधीशांनी त्याच्या वकिलांना सक्त ताकीद दिली होती. त्यामुळे आजच्या सुनावणीला सलमान न्यायालयात हजर राहिला नाही तर त्याच्या अडचणीत वाढ होऊ शकते. 

हम साथ साथ है या चित्रपटाचे चित्रीकरण राजस्थानमध्ये सुरू असताना सलमान आणि या चित्रपटातील त्याच्या काही सहकलाकारांनी काळवीटाची शिकार केली असल्याचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला होता. या प्रकरणात सलमानला दोषी ठरवण्यात आले असले तरी त्याचे सहकलाकार अभिनेता सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांना निर्दोष ठरवण्यात आले होते. सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. राजस्थान पोलिसांनी या प्रकाराची दखल घेतली असून चौकशीही सुरू केली आहे. याप्रकरणी पोलीस उपायुक्त डी. सिंह यांनी अशा प्रकारे धमकी देणाऱ्यांमागे कोण आहे हे शोधण्याचे काम आम्ही करीत आहोत. जर ते कोण आहेत हे समजले तर आम्ही योग्य ती कारवाई करू. त्याचबरोबर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जाईल अशी माहिती दिली आहे.  

टॅग्स :Salman Khanसलमान खानJodhpur courtजोधपूर न्यायालयBlackbuck poaching caseकाळवीट शिकार प्रकरण