शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील आमदारांचा पगार वाढला; मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना किती वेतन मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 12:00 IST

वेतन वाढीच्या या प्रस्तावाला राष्ट्रपतींनी मान्यता दिल्यानंतर विधी व न्याय विभागाने वेतनवाढीची अधिसूचना जारी केली आहे.

दिल्ली - देशातील आमदार-खासदारांच्या पगाराबाबत सर्वसामान्यांना नेहमीच उत्सुकता असते. आमदारांना किती पगार मिळतो हे जाणून घ्यायला लोकांना आवडते. त्यात दिल्लीच्या आमदारांच्या वेतन भत्त्यात वाढ करण्याबाबत राष्ट्रपतींकडून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीतील आमदारांचा पगार ६६ टक्क्यांनी वाढला आहे. यापूर्वी ५४ हजार पगार आमदारांना मिळत असे.

वेतन वाढीच्या या प्रस्तावाला राष्ट्रपतींनी मान्यता दिल्यानंतर विधी व न्याय विभागाने वेतनवाढीची अधिसूचना जारी केली आहे. आता मुख्यमंत्री, मंत्री आणि विधानसभा अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते यांना महिन्याला एकूण १.७० लाख पगार मिळणार आहे. तर आमदारांचा पगार ९० हजारांपर्यंत पोहचला आहे. याआधी मुख्यमंत्र्यांना ७२ हजार वेतन मिळत होते. विशेष म्हणजे वेतनवाढीचा प्रस्ताव दिल्ली विधानसभेत ४ जुलै २०२२ रोजी मंजूर करण्यात आला होता. 

१२ वर्षांनी दिल्लीच्या आमदारांमध्ये झाली पगारवाढदिल्लीतील आमदारांच्या पगारवाढीबाबत एक बाब समोर आली आहे की, तब्बल १२ वर्षानंतर त्यांच्या पगारात वाढ झाली आहे. विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, १४ फेब्रुवारी २०२३ पासून आमदारांच्या वाढीव वेतनाची प्रणाली लागू होईल. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी जुलै महिन्यात वेगवेगळी विधेयके मंजूर करून पगारवाढीचा प्रस्ताव गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता. प्रस्तावाचा विचार केल्यानंतर, राष्ट्रपतींनी १४ फेब्रुवारीला त्यास मंजुरी दिली आहे, त्यामुळे आमदारांच्या पगारात ६६ टक्के वाढ झाली आहे.

आमदारांच्या पगाराचे ब्रेकअप जाणून घ्यायापूर्वी बेसिक १२ हजार होते ते आता ३० हजार झाले आहे. दैनिक भत्ता १००० होता तो आता १५०० झाला आहे. मुख्यमंत्री, मंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते यांचा बेसिक पगार १८ हजारांवरून ६० हजार झाला आहे. इतकेच नाही तर याशिवाय आमदारांना वार्षिक एक लाख रुपये प्रवास भत्ता मिळणार आहे, जो आतापर्यंत ५० हजार रुपये होता. दिल्लीतील आमदारांना प्रत्येक टर्ममध्ये लॅपटॉप, प्रिंटर, मोबाईल खरेदीसाठी एक लाख रुपये मिळणार आहेत. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप