शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'गरीब' खासदारांचे 'अच्छे दिन', दुप्पटीने वाढणार पगार? आज समितीची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 08:42 IST

एकीकडे सर्वसामान्य जनता महागाईच्या खाईत होरपळून निघत असताना  दुसरीकडे लोकप्रतिनिधी लाखभर पगारासाठी पुढे सरसावले आहे. देशातील खासदारांची रग्गड पगारवाढ होण्याची शक्यता

नवी दिल्ली: एकीकडे सर्वसामान्य जनता महागाईच्या खाईत होरपळून निघत असताना दुसरीकडे लोकप्रतिनिधी लाखभर पगारासाठी पुढे सरसावले आहे. देशातील खासदारांची रग्गड पगारवाढ होण्याची शक्यता आहे. राज्यसभा आणि लोकसभेत एकूण 800 खासदार आहेत. त्यांची बेसिक सॅलरी 50000 हून आता 1 लाख रुपये करण्याचा विचार सरकार करत आहे. पगारवाढीसंदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या समितीची बैठक आज (शुक्रवार) नवी दिल्लीत होणार आहे. यात खासदारांचा पगार दुप्पट करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.जुलै 2015 मध्ये खासदारांचं वेतन आणि भत्ते, यासंबंधी सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी भाजपचे वादग्रस्त खासदार आणि सध्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीनं आपल्या अहवालात 60 शिफारशी केल्या आहेत. 2010 पासून खासदारांची पगारवाढ झालेली नाही, तसंच सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना महागाई भत्ताही दिला जात नाही, या मुद्दे लक्षात घेऊन त्यांचा पगार दुपटीनं वाढवावा, असं त्यात ठळकपणे नमूद करण्यात आलं होतं. मात्र सरकारने अंमलात आणला नव्हता. मात्र, आता खासदारांचा पगार 1 लाखापर्यंत करण्याचा सरकारचा विचार असल्याचं समजतं आहे. आज दिल्लीत पगारवाढीसंदर्भात होणा-या बैठकीत खासदारांचा पगार दुप्पट करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खासदारांचे वेतन 50 हजारांवरून 1 लाख, मतदारसंघाचा भत्ता 45 हजारांवरून 90 हजार करण्याची शिफारस समितीने केली आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास खासदारांचे एकूण वेतन आणि भत्ते प्रति महिना 2 लाख 80 हजार इतके होईल.खासदारांचा पगार 100 टक्क्यांनी वाढवतानाच, माजी खासदारांना दिल्या जाणाऱ्या पेन्शनमध्ये 75 टक्क्यांच्या वाढीची शिफारसही संसदेच्या समितीनं केली आहे. त्या सोबतच, सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार निश्चित करण्यासाठी जसा वेतन आयोग असतो, त्याचप्रमाणे ठरावीक काळानं खासदारांच्या पगाराचा आढावा घेणारी यंत्रणा निर्माण करण्याची शिफारसही समितीनं केंद्राला केली आहे. 

टॅग्स :ParliamentसंसदMember of parliamentखासदारGovernmentसरकार