शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

शीखविरोधी दंगल: सज्जन कुमारला जन्मठेपेची शिक्षा, म्हणाला- 'मी 80 वर्षांचा झालोय, त्यामुळे...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 15:43 IST

पीडित महिला 1984 पासून न्यायाची वाट पाहत होती. आज अखेर राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने माजी काँग्रेस खासदाराला शिक्षा सुनावली.

Sajjan Kumar News :दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने 1984 च्या शीख विरोधी दंगलीप्रकरणी दोषी ठरलेले काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने 21 फेब्रुवारी रोजी शिक्षेवरील निर्णय राखून ठेवला होता. दंगलीदरम्यान सरस्वती विहारमधील जसवंत सिंग आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंग यांच्या हत्येशी संबंधित हे प्रकरण आहे. त्यावेळी सज्जन कुमार दिल्ली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचा खासदार होता. 

फाशीची शिक्षा देण्याची मागणी1984 च्या शीख विरोधी दंगलीत सज्जन कुमारने केलेल्या जमावाच्या हल्ल्यात जसवंत सिंग आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंग यांची 1 नोव्हेंबर 1984 रोजी हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी मृत जसवंत यांच्या पत्नीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सज्जन कुमार याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. अनेक वर्षांनंतर आता आज याप्रकरणी आरोपीला शिक्षा झाली आहे. विशेष म्हणजे, दिल्ली दंगलीशी संबंधित आणखी एका प्रकरणात सज्जन कुमार जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

मी 80 वर्षांचा झालोय, त्यामुळे...दिल्ली पोलिस आणि पीडितांनी हे प्रकरण दुर्मिळ प्रकरण मानून सज्जन कुमारला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालापूर्वी सज्जन कुमारने शिक्षेत सौम्यतेचे आवाहन केले होते. या प्रकरणात मला फाशीची शिक्षा देण्यास कोणताही आधार नसल्याचे त्याने आपल्या युक्तिवादात म्हटले. सज्जन कुमार म्हणाला की, मी 80 वर्षांचा झालो आहे. वाढत्या वयाबरोबर मी अनेक आजारांशी झुंजत आहे. मी 2018 पासून तुरुंगात आहे. तेव्हापासून मला कोणतीही फर्लो/पॅरोल मिळालेली नाही. तुरुंगात माझी वागणूक नेहमीच चांगली होती, माझ्याविरुद्ध कोणतीही तक्रार आली नाही. त्यामुळे माझ्यात सुधारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी तीनदा खासदार झालो,  अनेक सामाजिक कामे केली, त्यामुळे मी स्वतःला निर्दोष समजतो. न्यायालयाने मानवतावादी पैलू लक्षात घेऊन या प्रकरणात किमान शिक्षेचा निर्णय घ्यावा, अशी मागणी आरोपीने केली होती.

28 प्रकरणांमध्ये दोषी हिंसाचार आणि त्यानंतरच्या घटनांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नानावटी आयोगाने सांगितले की, दिल्लीत दंगलीच्या संदर्भात 578 एफआयआर नोंदवण्यात आले होते, ज्यामध्ये 2733 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी 240 प्रकरणे “अज्ञात” म्हणून बंद करण्यात आली, तर 250 प्रकरणांमध्ये लोकांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. केवळ 28 प्रकरणांमध्ये दोष सिद्ध झाले, ज्यात अंदाजे 400 लोकांना दोषी ठरवण्यात आले. त्यावेळी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि खासदार सज्जन कुमार यांच्यावर 1 आणि 2 नोव्हेंबर 1984 रोजी दिल्लीतील पालम कॉलनीमध्ये पाच जणांच्या हत्येचा आरोपही होता.  

टॅग्स :delhiदिल्लीCourtन्यायालयdelhi violenceदिल्लीcongressकाँग्रेस