शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

तिहेरी तलाकविरोधात लढणारी सायरा बानो भाजपात

By हेमंत बावकर | Published: October 11, 2020 10:35 AM

Saira Bano Triple Talaq : सायरा बानो ही पहिली मुस्लिम महिला आहे जिने तिहेरी तलाक विरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता.

ठळक मुद्दे23 फेब्रुवारी 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयात ट्रिपल तलाकविरोधात याचिका दाखल केली होती. न्यायालयातील याचिकेत तिहेरी तलाकसह निकाह हलालावरही तिने आव्हान दिले होते. न्यायालयाने यावर 22 ऑगस्ट 2017 मध्ये निकाल देत सहा महिन्यांत संसदेत कायदा करण्याचे आदेश दिले होते. 

तिहेरी तलाकविरोधात लढाई लढणारी महिला सायरा बानो हिने भाजपात प्रवेश केला आहे. उत्तराखंडच्या उधमसिंह नगर जिल्ह्यात राहणारी सायरा बानो हिने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बंशीधर भगत यांच्या उपस्थितीत भाजपाची सदस्यता घेतली. 

सायरा बानो ही पहिली मुस्लिम महिला आहे जिने तिहेरी तलाक विरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. त्यांनी 23 फेब्रुवारी 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयात ट्रिपल तलाकविरोधात याचिका दाखल केली होती. या कायदेशीर लढाईत न्यायालयाने तिहेरी तलाकवर ऐतिहासिक निर्णय दिला होता. 

न्यायालयातील याचिकेत तिहेरी तलाकसह निकाह हलालावरही तिने आव्हान दिले होते. तसेच समाजातील एकापेक्षा जास्त विवाहच्या प्रथेवरही आवाज उठवत ही प्रथा संपविण्याची मागणी केली होती. सायराच्या म्हणण्यानुसार तिहेरी तलाक हे संविधानाच्या 14 आणि 15 अनुच्छेदानुरास मिळालेल्या मुलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे. न्यायालयाने यावर 22 ऑगस्ट 2017 मध्ये निकाल देत सहा महिन्यांत संसदेत कायदा करण्याचे आदेश दिले होते. भाजपात प्रवेश केल्यानंतर सायरा बानो हिने सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या विचार, नितीमुळे प्रेरित झाले आहे. मी यापुढेही महिलांना न्याय देण्यासाठी काम करणार आहे.  

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकBJPभाजपा