शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

काँग्रेस नेते तथा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली यांना साहित्य अकादमी पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 06:50 IST

वीरप्पा मोईली यांचे वय ८० आहे. केंद्रीय पेट्रोलियममंत्री, पर्यावरणमंत्री, विधी आणि न्याय मंत्रालय अशा खात्यांचा कारभार त्यांनी सांभाळला होता. विशेष म्हणजे ते कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्रीही राहिलेले आहेत. 

नवी दिल्ली  : काँग्रेसचे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली (Veerappa Moily) यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी जैन धर्माचे भगवान बाहुबली यांच्या जीवनचरित्रावर ‘श्री बाहुबली अहिंसादिग्विजयम’ हे महाकाव्य रचले. या त्यांच्या साहित्यकृतीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. (Sahitya Akademi Award to Congress leader and former Chief Minister of Karnataka Veerappa Moily)वीरप्पा मोईली यांचे वय ८० आहे. केंद्रीय पेट्रोलियममंत्री, पर्यावरणमंत्री, विधी आणि न्याय मंत्रालय अशा खात्यांचा कारभार त्यांनी सांभाळला होता. विशेष म्हणजे ते कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्रीही राहिलेले आहेत. राजकारण म्हणजे मूर्ख लोकांचा अड्डा, दहशत गर्दी, काहीच न कळणारे लोक असा समज असतो. मात्र, वीरप्पा मोईली त्याला अपवाद ठरतात. भगवान बाहुबली हे जैनधर्मीयांतील एक धगधगते वादळ आहे. त्यांच्या जीवनावरती काही लिहणे ही एवढी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी भरपूर वाचन, मनन, चिंतन लागतं. वीरप्पा मोईली सांगतात की ते रोज या लिखाणासाठी, संशोधनासाठी तीन ते चार तास द्यायचो. तेव्हा हे महाकाव्य साडेतीन वर्षांत पूर्ण झाले. बाहुबली भगवान म्हणजे जास्तीत जास्त रवींद्र जैन यांचे बाहुबली भगवान का मस्तकाभिषेक हे एवढंच माहीत असते; पण बाहुबलींचे चरित्र अभ्यासणारा असा कुणीतरी नेता आहे. हे लक्षात यायला वेळ लागतो. जैन साहित्याचे रेफरन्स शोधणे, शब्दांचा अर्थ लावणे हे महाकठीण काम होऊन जाते. आचार्य श्री विद्यासागर महाराजांनी रचलेले आणि ज्ञानपीठानं प्रकाशित केलंले ‘मूक माटी’ वाचताना अनेक शब्दांचे अर्थ लागत नाहीत; पण त्याला तोड म्हणून मुनी निर्वेगसागर यांनी लिहलेले ‘संक्षिप्त मूक माटी’ वाचताना त्यातील शब्दांचे अर्थ लागत जातात.

मोईली यांचे अभिनंदनराजकारणात असणारा एखादा माणूस असे परिश्रम घेऊन काही रचतो, ही मनाला आनंद देणारी गोष्ट आहे. वीरप्पा मोईली यांचे अभिनंदन, अशी प्रतिक्रिया सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :sahitya akademi awardसाहित्य अकादमी पुरस्कारcongressकाँग्रेसKarnatakकर्नाटक