शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

प्रवीण बांदेकरांच्या 'उजव्या सोंडेच्या बाहुल्या' कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 19:14 IST

Sahitya Akademi Award : मराठीत 'उजव्या सोंडेच्या बाहुल्या' या कादंबरीसाठी प्रवीण दशरथ बांदेकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तर कोकणीसाठी माया अनिल खर्नांगटे यांच्या अमृतवेल या कादंबरीची निवड करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : साहित्य अकादमीचे २०२२ या वर्षासाठीचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यंदा साहित्य पुरस्कारासाठी मराठी व कोकणी या दोन्ही भाषांतील कादंबऱ्यांची निवड करण्यात आली आहे. मराठीत 'उजव्या सोंडेच्या बाहुल्या' या कादंबरीसाठी प्रवीण दशरथ बांदेकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तर कोकणीसाठी माया अनिल खर्नांगटे यांच्या अमृतवेल या कादंबरीची निवड करण्यात आली आहे. प्रत्येकी १ लाख रूपये रोख, सन्मानचिन्ह व शाल असे पुरस्काराचे स्वरूप असून अकादमीच्या साहित्य अक्षरोत्सवात पुरस्कार प्रदान केले जातील.

याचबरोबर, 'इन गुड फेथ' या सबा नकवी लिखित इंग्रजी पुस्तकाच्या 'सलोख्याचे प्रदेश : शोध सहिष्णू भारताचा' या मराठी अनुवादासाठी प्रमोद मुजुमदार यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच, यंदा इंग्रजीसाठी अनुराधा रॉय यांच्या –आल द लाईव्हज व्हेनेव्हर लिव्हड या पुस्तकाची, तर हिंदीसाठी थुमाडी के शब्द या बद्रीनारायण यांच्या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे. साहित्य अकादमीचा बंगालीसाठीचा तर कोकणी व हिंदीसह ७ भाषांसाठीचे अनुवाद पुरस्कार नंतर जाहीर केला जाईल. साहित्य अकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत २३ भाषांतील साहित्यकृतींना अकादमी सन्मान देण्याचा निर्णय घेण्यात आला असे अकादमीचे सचिव डॉ के श्रीनिवास राव यांनी सांगितले. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये ७ काव्यसंग्रह, ६ कादंबऱ्या, २ कथासंग्रह, ३ नाटके, २ टीकात्मक पुस्तके, प्रत्येकी १ आत्मकथन, लेखसंग्रह व एतिहासिक कथासंग्रहाची निवड करण्यात आल्याचेही डॉ के श्रीनिवास राव यांनी सांगितले. दरम्यान, ज्येष्ठ साहित्यिक भआलचंद्र नेमाडे, ज्येष्ठ संपादक व खासदार कुमार केतकर आणि प्रा. नितीन रिंढे यांच्या निवड समितीने यंदाच्या मराठी साहित्यकृतीची निवड या पुरस्कारसाठी केली.

टॅग्स :sahitya akademi awardसाहित्य अकादमी पुरस्कार