शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णात खोत यांच्या 'रिंगाण' कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 17:27 IST

Sahitya Akademi award : देशातील २४ भाषांमध्ये उत्कृष्ट साहित्य निर्माण करणाऱ्या लेखकांना हा सन्मान दिला जातो.

Sahitya Akademi Award : नवी दिल्ली : साहित्य विश्वातील अतिशय मानाचा मानला जाणारा 'साहित्य अकादमी'चा पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठीमध्ये कादंबरीकार कृष्णात खोत यांच्या 'रिंगाण' या पुस्तकाला तर कोकणीमध्ये प्रकाश पर्यकर यांच्या 'वर्सल' या कथासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. यंदाचे साहित्य अकादमीचे पुरस्कार बुधवारी जाहीर झाले. देशातील २४ भाषांमध्ये उत्कृष्ट साहित्य निर्माण करणाऱ्या लेखकांना हा सन्मान दिला जातो. यावेळी यंदाचा हिंदीतील साहित्य अकादमी पुरस्कार संजीव यांना त्यांच्या 'मुझे पाहानो' या कादंबरीसाठी देण्यात आला आहे. तर इंग्रजीसाठी नीलम शरण गौर आणि उर्दूसाठी सादिक नवाब सहार यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

साहित्य अकादमीचे पुरस्कार विजेत्याच्या नावाची घोषणा साहित्य अकादमीचे सचिव डॉ. श्रीनिवासराव यांनी हिंदी भाषेसोबतच त्यांनी इतर भाषांमधील विजेत्यांची नावेही जाहीर केली आहेत. या सर्वांना १२ मार्च २०२४ रोजी नवी दिल्लीतील कमानी सभागृहात हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.

रिंगाण विस्थापितांच्या जगण्याची कहाणी...रिंगाण या कृष्णात खोत यांच्या कादंबरीत विस्थापितांच्या जगण्याचे चित्रण आलेले आहे. देवाप्पाच्या पाळीव म्हशी रानटी होतात, त्यांच्या मूळपदावर जातात आणि त्यातून त्यांचा नि देवप्पाचा संघर्ष उभा राहतो. कृष्णात खोत हे पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी येथील रहिवाशी आहेत. पन्हाळा विद्यामंदिर येथे त्यांचे शिक्षण झाले आहे.नवद्दोत्तरी काळातील मराठी साहित्याला वेगळी दिशा देणारे लेखक म्हणून प्रा. खोत यांची ओळख आहे. गावसंस्कृती आणि बदलते खेड्यातील जीवनसंघर्ष त्यांच्या लिखाणाचा विषय आहे. त्यांच्या गावठाण, रौंदाळा, झडझिंबड आणि धूळमाती या कादंबऱ्यांमधून बदलत्या ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण केले आहे. याशिवाय नांगरल्याविन भुई हे ललित व्यक्तिचित्रण प्रकाशित झाले आहेत. त्यांना राज्यशासनासह अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत.

डॉ. प्रकाश पर्येकर यांचे "वर्सल" कथा संग्रहकोकणी साहित्यिक डॉ. प्रकाश पर्येकर यांना "वर्सल" या कथा संग्रहासाठी केंद्रीय साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. यापूर्वी त्यांना "इगडी,बिाडी, तिगडी, था" या बाल साहित्यासाठी साहित्य अकादमीच्या बाल साहित्य पुरस्कारही प्राप्त झाला होता. डॉ. प्रकाश पर्येकर हे कोकणी साहित्यिक असून ते सत्तरी येथील आहे. त्यांचे लखेन हे ग्रामीण भूगोल, ग्रामीण संस्कृती तसेच तेथील लोकांवर आधारीत असते."वर्सल" हे पुस्तक २०२१ मध्ये प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात २० कथा एकत्र केल्या आहेत .९० च्या दशकात आणि विसाव्या दशकाच्या सुरुवातीस विविध कोकणीमध्ये प्रकाशनांमध्ये वर्सल चे प्रकाश झाले आहे. यातील अनेक कथांचे मराठी, हिंदी, काश्मिरी, मल्याळम, कन्नड, उर्दू, ओडिया आदी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. 

टॅग्स :sahitya akademi awardसाहित्य अकादमी पुरस्कार