शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या अडचणीत वाढ; निवडणूक आयोग कारवाईच्या तयारीत? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 10:48 IST

नथुराम गोडसेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

भोपाळ - नथुराम गोडसेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नथुराम गोडसे हा देशभक्त होता, असे वक्तव्य केल्याने वादाला तोंड फुटल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांनी माफी मागितली होती. मात्र साध्वींच्या या वक्तव्याची दखल निवडणूक आयोगाने घेतली असून, निवडणूक आयोगाने मध्य प्रदेशच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडून याबाबत अहवाल मागवला आहे. दक्षिणेतील अभिनेते कमल हसन यांनी नथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी होता, असा दावा केला होता. त्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता साध्वी प्रज्ञा सिंह यांनी नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि राहील, असे विधान केले होते. त्यानंतर वादास तोंड फुटले होते. मात्र भारतीय जनता पक्षाने साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्यापासून अंतर राखताना त्यांना माफी मागण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांनी आपल्या विधानाबाबत माफी मागितली होती. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या  माहितीनुसार मध्य प्रदेशच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी आपल्या अहवालामध्ये प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर कारवाईची शिफारस केली आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींविषयी अपमानकारक टिप्पणी केली आहे. त्यामुळे निवडणुकीदरम्यान अशांतता निर्माण होऊ शकते, असे मध्य प्रदेशच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी आपल्या अहवालात नमूद केल्याचे वृत्त आहे. मात्र नथुरामबाबतच्या वक्तव्यामुळे वाद वाढल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांनी माफी मागितली होती.  'हे माझं वैयक्तिक मत आहे. मी रोड शोमध्ये होते त्यावेळी जाताना मी हे उत्तर दिलं आहे. माझ्या भावना तशा नव्हत्या. यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यांची मी माफी मागते. गांधीजींनी देशासाठी जे केलं आहे ते विसरता येणार नाही. मी त्यांचा सन्मान करते. मी पक्षाच्या शिस्तीचं पालन करते. जी पक्षाची भूमिका आहे तीच भूमिका माझी आहे' असे साध्वी प्रज्ञा सिंह यांनी माफी मागताना म्हटले होते. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना भाजपाने भोपाळमधून उमेदवारी दिली आहे. मात्र उमेदवारी मिळाल्यापासूनच साध्वी प्रज्ञा सिंह या त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहेत. 

टॅग्स :Sadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगbhopal-pcभोपाळLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMadhya Pradesh Lok Sabha Election 2019मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक 2019