शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचारांपासून वाचण्यासाठी मुस्लिम मुलींनी हिंदूशी लग्न करावं, भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 15:24 IST

उलट-सुलट विधानं करुन नेहमी चर्चेत असणाऱ्या भाजपा खासदार साध्वी प्राची यांनी मुस्लिम तरुणींना अजब-गजब सल्ला देऊन नवीन वादाला तोंड फोडले आहे.

नवी दिल्ली - उलट-सुलट विधानं करुन नेहमी चर्चेत असणाऱ्या भाजपा खासदार साध्वी प्राची यांनी मुस्लिम तरुणींना अजब-गजब सल्ला देऊन नवीन वादाला तोंड फोडले आहे. हलाला आणि तिहेरी तलाक प्रथेपासून वाचण्यासाठी मुस्लिम तरुणींनी धर्म बदलून हिंदू तरुणांसोबत लग्न केले पाहिजे, असा अजब सल्ला साध्वी प्राची यांनी दिला आहे. पुढे त्यांनी असंही म्हटलं की, ''इस्लाम धर्म कुप्रथांनी भरलेला आहे, अशा परिस्थितीत धर्म परिवर्तन करुन हिंदूंसोबत लग्न केले तर हलालासारख्या वेदनादायी प्रथांपासून बचाव होऊ शकतो. हिंदू धर्मात स्वतःचा समावेश करुन मुस्लिम महिला आयुष्यभरासाठी अत्याचार आणि धमक्यांपासून स्वतःला वाचवू शकतात''. 

साध्वी इथेच थांबल्या नाही तर पुढे असाही सल्ला दिला की, हिंदू समाजात तिहेरी तलाक किंवा हलालाचा देखील कोणता त्रास नाही. हिंदू धर्मामध्ये विवाह केल्यास तुमचे चांगल्या संस्कारासहित स्वागत होईल. तिहेरी तलाकसंदर्भात साध्वी प्राची म्हणाल्या की, हलाला किंवा धर्मातून बहिष्कृत करण्याची धमकी देणाऱ्या मौलवींना पीडित महिलांनी चपराक लगावली पाहिजे. समाज गलिच्छ करण्याचं काम करणाऱ्या अशा मौलवींना शिक्षा झाली पाहिजे''

दरम्यान, साध्वी प्राची यांच्या विधानामुळे नवीन वाद सुरू झाला आहे. त्यांच्या विधानाला विरोध दर्शवत देवबंदी उलमानं म्हटलंय की, सर्व धर्माचे आपापले वैयक्तिक कायदे असतात, त्यानुसार सर्व जण आपापले आयुष्य जगतात. त्यामुळे हा आमच्या समाजाची बदनामी करण्याचा कट आहे.  

एकूणच साध्वी प्राची यांनी उलटसुलट विधान करत नवीन वाद निर्माण केला आहे. 

टॅग्स :Muslimमुस्लीमHinduहिंदूBJPभाजपा