शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
3
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
4
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
5
"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?
6
Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदिपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश
7
ज्योती मल्होत्रा प्रकरणानं चर्चा, एका गुप्तहेराला किती पैसे देतं पाकिस्तान?; डिटेल रिपोर्ट
8
दरमहा १० हजारांची बचत? म्युच्युअल फंडात कुठे आणि कशी करावी गुंतवणूक? फक्त 'ही' चूक करू नका
9
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
10
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
11
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
12
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं
13
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
14
भयंकर! सुनेने रील बनवताच सासरच्या मंडळींना राग अनावर; संतापलेल्या सासऱ्याने फोडलं डोकं
15
मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..."
16
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
17
ज्योतीची साथीदार, एकत्रच करत होत्या पाकिस्तान वाऱ्या; कोण आहे प्रियंका सेनापती?
18
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
19
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
20
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."

साधुग्राममधील स्वच्छतेचा ठेका राष्ट्रवादीच्या नेत्याला देण्याचा घाट सेना महानगरप्रमुखांचा आरोप : प्रशासनावरही संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2015 00:30 IST

नाशिक : साधुग्राममधील स्वच्छतेचा ठेका स्थायी समितीने ज्या कंपनीला देण्याचा घाट घातला आहे ती क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हीसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी राष्ट्रवादीचे मुंबईतील नेते आणि म्हाडाचे माजी चेअरमन प्रसाद लाड यांची असून, सदर ठेका राष्ट्रवादीच्या नेत्याला मिळावा यासाठीच भुजबळफार्मवरुन सूत्रे हलविली जाऊन शहराला वेठीस धरण्याचा प्रकार चालविला जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे महानगरप्रमुख व महापालिकेतील गटनेते अजय बोरस्ते यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना केला आहे.

नाशिक : साधुग्राममधील स्वच्छतेचा ठेका स्थायी समितीने ज्या कंपनीला देण्याचा घाट घातला आहे ती क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हीसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी राष्ट्रवादीचे मुंबईतील नेते आणि म्हाडाचे माजी चेअरमन प्रसाद लाड यांची असून, सदर ठेका राष्ट्रवादीच्या नेत्याला मिळावा यासाठीच भुजबळफार्मवरुन सूत्रे हलविली जाऊन शहराला वेठीस धरण्याचा प्रकार चालविला जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे महानगरप्रमुख व महापालिकेतील गटनेते अजय बोरस्ते यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना केला आहे.साधुग्राम स्वच्छतेच्या ठेक्याचे प्रकरण न्यायालयात जाऊन पोहोचले असतानाच अजय बोरस्ते यांनी या प्रकरणाबाबत पोलखोल करत सांगितले, स्थायी समितीने द्वितीय न्यूनतम निविदाधारक क्रिस्टल इंटिगे्रटेड या कंपनीला ठेका देण्याचे आदेश काढले आहेत. सदर कंपनी ही राष्ट्रवादीच्या नेत्याची आहे आणि याच कंपनीकडे भुजबळ फार्म, मेट, राष्ट्रवादीचे कार्यालय यांच्या देखभालीचे काम आहे. महापालिकेतील मनसेच्या सत्तेच्या दोर्‍या भुजबळ फार्मच्या हाती आहे. मुळात प्रथम न्यूनतम निविदादर भरणार्‍या वॉटर ग्रेस प्रॉडक्टस् या कंपनीवर जर थकबाकी असेल आणि तो काळ्या यादीत असेल तर पूर्व पात्रता फेरीतच आयुक्तांनी त्याला बाद ठरवायला हवे होते. आयुक्तांनी सदर प्रस्ताव तपासूनच स्थायीकडे पाठवायला हवा होता. परंतु या प्रकरणात प्रशासनाचीही भूमिका संशयास्पद दिसून येते. प्रशासन नेमके कोणाच्या तालावर नाचते आहे, याचा छडा लागला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीत बारकावे शोधणार्‍या प्रशासनाला करोडो रुपयांचा ठेका देताना त्यातील त्रुटी का लक्षात आल्या नाहीत, असा सवालही बोरस्ते यांनी केला. साधुग्रामची स्वच्छता ठेकेदारामार्फत न करता त्यासाठी महापालिकेनेच मानधनावर स्थानिक बेरोजगारांना काम द्यावे, अशी मागणीही बोरस्ते यांनी यावेळी बोलताना केली.