वागदर्डीच्या सरपंचपदी संसारे, उपसरपंच पगार
By admin | Updated: August 11, 2015 22:11 IST
दरेगाव : चांदवड तालुक्याच्या पूर्व भागातील वागदर्डी ग्रुप ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पडली असून येथे सरपंचपदी संघरत्न संसारे तर उपसरपंचपदी देवचंद पगार यांची निवड झाली आहे. येथील सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे.
वागदर्डीच्या सरपंचपदी संसारे, उपसरपंच पगार
दरेगाव : चांदवड तालुक्याच्या पूर्व भागातील वागदर्डी ग्रुप ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पडली असून येथे सरपंचपदी संघरत्न संसारे तर उपसरपंचपदी देवचंद पगार यांची निवड झाली आहे. येथील सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. निवडणूक निर्णय अधिकारी वडाळीभोई मंडळ अधिकारी पी. आर. कन्नोरे, एस. एम. व्यवहारे व तलाठी के. व्ही. भालमुठे यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अशोक बिडगर, राजाराम सोनवणे, शांताबाई हाके, निर्मला आहेर, हिरामण पगार, निर्मला गागरे व रंजनाबाई पडवळ यांच्यासह माजी सरपंच म्हसू गागरे, दिनकर पगार, शिवाजी संसारे, बाळू संसारे, भास्कर संसारे, चंदन आहिरे, संतोष बिडगर, शाम गांगुर्डे अशोक एंडाईत, विनायक बिडगर आदि ग्रामस्थ उपस्थित होते. ( वार्ताहर) कॅप्शन: वागदर्डी ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच संघरत्न संसारे, उपसरपंच देवचंद पगार यांच्या समवेत ग्रामपंचायत सदस्य अशोक बिडगर, दिनकर पगार व माजी सरपंच म्हसू नागरे. (फोटो- ११ दरेगाव २)