शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सचिन आणि रेखा यांच्या राज्यसभेतील अकार्यक्षम इनिंगची अखेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 13:57 IST

या दोघांनी फारच कमी दिवस राज्यसभेत उपस्थिती लावली होती आणि त्यामुळे ते टीकेचे धनी ठरत होते.

ठळक मुद्देसचिन आणि रेखा यांच्यासह राज्यसभेचे 85 सदस्य आज निवृत्त झाले.

नवी दिल्ली : भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि बॉलीवूडच्या अभिनेत्री रेखा यांची राज्यसभेतील अकार्यक्षम इनिंग अखेर संपुष्टात आली आहे. या दोन्ही व्यक्तींनी आपल्या क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली असली तरी राज्यसभेत मात्र त्यांनी अपेक्षाभंग केला. या दोघांनी फारच कमी दिवस राज्यसभेत उपस्थिती लावली होती आणि त्यामुळे ते टीकेचे धनी ठरत होते. सचिन आणि रेखा यांच्यासह राज्यसभेचे 85 सदस्य आज निवृत्त झाले.

आतापर्यंतच्या सहा वर्षांमध्ये या दोघांनी किती दिवस संसदेत उपस्थिती लावली आणि  किती प्रश्न विचारले, हे सांगणे न बरे. कारण या दोघांचाही संसदेच्या कामकाजातील सहभाग अत्यल्प असाच राहीलेला आहे.रेखा यांनी सहा वर्षांच्या कार्यकाळात एकही प्रश्न उपस्थित केलेला नाही. प्रश्न उपस्थित केला नाही म्हणजे त्यांचा केंद्र सरकारशी संवाद झालेला नाही. कारण जेव्हा कोणी खासदार प्रश्न विचारतात तेव्हा त्याचे उत्तर सरकारकडून दिले जाते आणि हे सारे राज्यसभेच्या संकेतस्थळावर पाहायला मिळते. बॉलीवूडमध्ये रेखा या चर्चेचा विषय असल्या तरी संसदेमध्ये त्यांच्या नावाची चर्चाच झाली नाही. 2017 साली संसदेमध्ये 373 दिवस कामकाज चालले, यामध्ये फक्त 18 दिवस रेखा उपस्थित राहील्या होत्या. म्हणजेच त्यांची उपस्थिती ही फक्त 5 टक्के एवढीच होती.रेखा यांनी संसदेत सहा वर्षांमध्ये एकही प्रश्न विचारला नाही, पण सचिनने आतापर्यंत 22 प्रश्न विचारले. सचिनला या प्रश्नांची उत्तरेही सरकारने दिली आहेत. पण या सहा वर्षांत संसदेमध्ये सचिनच्या नावाचीही जास्त चर्चा झाली नसल्याचेच समोर आले आहे.

टॅग्स :Sachin Tendulkarसचिन तेंडूलकरRekhaरेखा