शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सचिन आणि रेखा यांचे दर्शन संसदेला होणार ; खासदारकी वाचवण्यासाठीचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 17:03 IST

गेल्या सहा वर्षांमध्ये सचिन आणि रेखा यांची उपस्थिती नगण्यच अशी होती. पण आपली खासदारकी वाचवण्यासाठी मात्र त्यांनी प्रत्येक सत्रामध्ये नाममात्र उपस्थिती मात्र लावली होती.

ठळक मुद्देरेखा यांनी सहा वर्षांच्या कार्यकाळात एकही प्रश्न उपस्थित केलेला नाही.

नवी दिल्ली : सचिन तेंडुलकर आणि रेखा, यांची ओळख भारतीयांना तरी करून देण्याची गरज नाही. आपापल्या क्षेत्रामध्ये या दोघांनीही आपला अमीट ठसा उमटवला आहे. त्यामुळेच त्यांना राज्य सभेत मानद प्रवेशही देण्यात आला. पण गेल्या सहा वर्षांमध्ये त्यांनी उपस्थिती नगण्यच अशी होती. पण आपली खासदारकी वाचवण्यासाठी मात्र त्यांनी प्रत्येक सत्रामध्ये नाममात्र उपस्थिती मात्र लावली होती. आता अखेरच्या सत्रामध्येही सचिन आणि रेखा हे एखाद दोन दिवस आपले दर्शन संसदेला देण्याचा तयारीत असतील. पण या कालावधीत सचिन आणि रेखा यांची काही व्यावसायिक कामे असतील तर त्यांचे दर्शन दुर्लभही होऊ शकते.आतापर्यंतच्या सहा वर्षांमध्ये या दोघांनी किती दिवस संसदेत उपस्थिती लावली आणि  किती प्रश्न विचारले, हे सांगणे न बरे. कारण या दोघांचाही संसदेच्या कामकाजातील सहभाग अत्यल्प असाच राहीलेला आहे.रेखा यांनी सहा वर्षांच्या कार्यकाळात एकही प्रश्न उपस्थित केलेला नाही. प्रश्न उपस्थित केला नाही म्हणजे त्यांचा केंद्र सरकारशी संवाद झालेला नाही. कारण जेव्हा कोणी खासदार प्रश्न विचारतात तेव्हा त्याचे उत्तर सरकारकडून दिले जाते आणि हे सारे राज्यसभेच्या संकेतस्थळावर पाहायला मिळते. बॉलीवूडमध्ये रेखा या चर्चेचा विषय असल्या तरी संसदेमध्ये त्यांच्या नावाची चर्चाच झाली नाही. 2017 साली संसदेमध्ये 373 दिवस कामकाज चालले, यामध्ये फक्त 18 दिवस रेखा उपस्थित राहील्या होत्या. म्हणजेच त्यांची उपस्थिती ही फक्त 5 टक्के एवढीच होती.रेखा यांनी संसदेत सहा वर्षांमध्ये एकही प्रश्न विचारला नाही, पण सचिनने आतापर्यंत 22 प्रश्न विचारले आहेत. सचिनला या प्रश्नांची उत्तरेही सरकारने दिली आहेत. पण या सहा वर्षांत संसदेमध्ये सचिनच्या नावाचीही जास्त चर्चा झाली नसल्याचेच समोर आले आहे.

टॅग्स :Sachin Tendulkarसचिन तेंडूलकरRekhaरेखा