शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

Sabarimala Temple : भाविकांच्या भावनेकडे दुर्लक्ष करण्यात येऊ नये, संघाचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 08:46 IST

सबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही हा वाद थांबलेला नाही. एकीकडे हिंदुत्ववादी संघटना या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

नवी दिल्ली - सबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही हा वाद थांबलेला नाही. एकीकडे हिंदुत्ववादी संघटना या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही आपली भूमिका स्पष्ट करताना भाविकांच्या भावनांकडे दुर्लक्ष करता येणार नाही अएसे मत मांडले आहे. तसेच या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येऊन न्यायिक तसेच अन्य पर्यायांवर विचार करावा, असा सल्ला संघाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आदर व्हायला हवा असे सांगतानाच हा नियम तातडीने लागू करण्याचा केरळ सरकारचा निर्णय दुर्दैवी असल्याचेही संघाने म्हटले आहे.   सुप्रीम कोर्टानं सबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशासंदर्भात महत्त्वपूर्ण निकाल देत मंदिरातील महिलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा केला होता. . महिला या पुरुषांपेक्षा दुय्यम नाहीत. महिलांना देवाची पूजा करण्यावरही बंधनं घातली जात आहेत. देवाशी असलेले नाते हे शारीरिक घटकावर ठरू शकत नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांनी यावेळी व्यक्त केले होते. मात्र या निकालानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना बुधवारी रस्त्यावर उतरल्या होत्या. निदर्शनं करणाऱ्या संघटनांमध्ये आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचाही समावेश आहे. प्रत्येक धार्मिक स्थळाची स्वतंत्र परंपरा असतो, त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय अस्वीकारार्ह आहे, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.दरम्यान, हा एका स्थानिक मंदिरातील परंपरेचा प्रश्न आहे. ज्यामध्ये महिलांसह लाखो भाविकांची श्रद्धा जोडली गेलेली आहे. या भाविकांची श्रद्धा आणि भावना दुर्लक्षुन चालणार नाही, असे संघाने स्पष्ट केले आहे. एखादी परंपरा जबरदस्तीने तोडण्याविरोधात आंदोलन करणाऱ्या भाविकांची आणि महिलांची उग्र प्रतिक्रिया उमटणे साहजिक आहे, असे संघाचे नेते भय्याजी जोशी यांनी सांगितले. तसेच भाविकांच्या भावनांकडे दुर्लक्ष करून कायद्याची अंमलबजावणी करणे दुर्दैवी असल्याचेही ते म्हणाले. का होती मंदिरात प्रवेशबंदी? केरळमधील सबरीमाला मंदिरात 10 ते 50 वर्ष वयोगटातील महिलांना प्रवेश दिला जात नव्हता. विशेषत: 15 वर्षांहून अधिक वयाच्या मुलींना मंदिरात प्रवेश नाकारण्यात येत होता. केवळ लहान मुली आणि वृद्ध महिलांना या मंदिरात प्रवेश दिला जायचा. मंदिरात विराजमान असलेले अयप्पा ब्रम्हचारी होते, अशी श्रद्धा आहे. सबरीमाला यात्रेच्या आधी 41 दिवस कठोर व्रत करण्याचा नियम आहे. मासिक पाळीमुळे महिला सलग 41 दिवस व्रत करू शकत नाहीत. त्यामुळेच 10 ते 50 या वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता. सबरीमाला मंदिर प्रकरणात न्यायालय महिलांच्या बाजूनं निकाल देईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. या प्रकरणाच्या शेवटच्या सुनावणीत न्यायालयानं आपला रोख स्पष्ट केला होता. मंदिर प्रवेशात भेदभाव केला जाऊ शकत नाही. देवाचं दर्शन हा महिलांचा घटनात्मक अधिकार आहे, असं न्यायालयानं सुनावणी म्हटलं होतं.  

टॅग्स :Sabarimala Templeसबरीमाला मंदिरKeralaकेरळRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ