शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

Sabarimala Temple : शबरीमाला मंदिर परिसरात तणाव कायम, जमावबंदी लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 09:02 IST

केरळच्या शबरीमाला डोंगरावरील सुप्रसिद्ध अयप्पा मंदिरात महिला प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात सध्या तणावाचे वातावरण सुरु आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

तिरुवनंतपुरम : केरळच्या शबरीमाला डोंगरावरील सुप्रसिद्ध अयप्पा मंदिरात महिला प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात सध्या तणावाचे वातावरण सुरु आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच, येथील निल्लकल, पंपा, एल्वाकुलम, सन्निधनम या भागात कलम 144 नुसार जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 

आज शबरीमाला संरक्षण समितीने आज गुरूवार 12 तासांच्या बंदची घोषणा केली आहे. भाजपा, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि अन्य स्थानिक संघटनांनी या बंदला समर्थन दिले आहे. काँग्रेस या बंदमध्ये सहभागी होणार नाही मात्र, राज्यात विरोध प्रदर्शन करणार आहे.महिलांना प्रवेश खुला करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केरळच्या शबरीमाला डोंगरावरील सुप्रसिद्ध अयप्पा मंदिर महिनाभराच्या धार्मिक विधींसाठी बुधवारी सायंकाळी प्रथमच प्रचंड तणावाच्या वातावरणात उघडले.  मंदिराचे दरवाजे उघडण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकरणाऱ्यांनी बुधवार सकाळपासूनच मंदिर परिसरात जोरदार निदर्शने केली होती.

प्रथा आणि परंपरा पाळून फारशा महिलांनी मंदिरात जाण्याचा आग्रह धरला नाही. मात्र कुटुंबीयांसमवेत ज्या काही महिला जाताना आढळल्या, त्यांची वाहने हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी अडवून त्या महिलांना खाली उतरविले. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या निलक्कल येथे बुधवारी सकाळी वृत्तांकन करण्यासाठी जाणाऱ्या महिला पत्रकारांनाही निदर्शकांनी धक्काबुक्की व मारहाण केली. आंध्र प्रदेशातून मंदिरात प्रवेश करण्यासाठी आलेल्या दोन महिलांनाही परत जावे लागले.

 

 

टॅग्स :Sabarimala Templeसबरीमाला मंदिरKeralaकेरळ