शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

Sabarimala Temple : डाव्यांनी बाबरी मशिद प्रकरणाशी केली तुलना, काँग्रेसचीही वादात उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 17:18 IST

केरळमधील प्रसिद्ध सबरीमाला मंदिरातील प्रवेशाच्या मुद्द्यावरून केरळमध्ये राजकीय वाद पेटला असून, राज्यातील सत्ताधारी असलेले डावे पक्ष

तिरुवनंतपुरमन - केरळमधील प्रसिद्ध सबरीमाला मंदिरातील प्रवेशाच्या मुद्द्यावरून केरळमध्ये राजकीय वाद पेटला असून, राज्यातील सत्ताधारी असलेले डावे पक्ष आणि भाजपा आमनेसामने आले आहेत. तर काँग्रेसनेही वादात उडी घेऊन राज्य सरकारवर टीका केली आहे. सबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशावरून उफाळलेल्या वादाला संघ आणि भाजपाची फूस असल्याचा आरोप सीपीएमचे महासचिव सीताराम येच्युरी यांनी केला आहे. तर सबरीमाला मंदिर हे काही पर्यटन स्थळ नाही, तिथे केवळ भक्तच जाऊ शकतात, असे काँग्रेसचे नेते आर. चेन्निथला यांनी म्हटले आहे. 

या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सीताराम येच्युरी यांनी सबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशावरून सुरू असलेल्या वादाची तुलना बाबरी मशीद वादाशी केली आहे. तसेच या वादामागे संघ आणि भाजपाचे कारस्थान असल्याचा आरोप येच्युरी यांनी केला. तसेच इथे चोरच पोलिसांवर आरोप करत आहेत, असा टोला त्यांनी काँग्रेसला लावला आहे. 

मात्र या संपूर्ण प्रकरणात केरळ सरकार बॅकफूटवर आले असून, राज्याचे देवासम मंत्री काडाकमपल्ली सुंदरन यांनी काही तत्त्वांकडून जाणूनबुजून समस्या उत्पन्न करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे काँग्रेसने मात्र भाविकांची बाजू घेतली आहे. सबरीमाला मंदिर हे काही पर्यटन स्थळ नाही, तिथे केवळ भक्तच जाऊ शकतात, असे काँग्रेसचे नेते आर. चेन्निथला यांनी सांगितले.   शबरीमाला मंदिरामध्ये सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश द्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही केरळमध्ये तणाव सुरू आहे. शुक्रवारी सुद्धा महिलांना मंदिरामध्ये प्रवेश करता आला नाही. निदर्शकांनी केलेल्या विरोधामुळे मंदिरात जाण्यासाठी पोलिसांच्या गराड्यात निघालेल्या दोन महिलांना परतावे लागले. पोलीस सुद्धा विरोध करणाऱ्या भाविकांना हटवू शकलेले नाहीत.

 

टॅग्स :Sabarimala Templeसबरीमाला मंदिरKeralaकेरळPoliticsराजकारण