शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

... तर केरळ सरकार बरखास्त केलं जाईल, अमित शहांचा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 17:34 IST

केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचा वाद चांगलाच पेटला आहे. या मंदिरात महिलांना प्रवेश देऊ नये, यासाठी तेथील भक्तगण एकत्र येत आहेत.

नवी दिल्ली - भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी केरळसरकार बरखास्त करण्याचा इशारा दिला आहे. जर, अयप्पा स्वामींच्या भक्तांना अटक करण्याचं सत्र राज्य सरकारने असेच सुरू ठेवल्यास, केरळमधील सरकार केंद्र सरकारकडून बरखास्त केलं जाईल, असं अमित शहा यांनी म्हटले. केरळमध्ये शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यास येथील भक्तांनी विरोध केला आहे. त्यावरुन, हा वाद उफाळला आहे. 

केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचा वाद चांगलाच पेटला आहे. या मंदिरात महिलांना प्रवेश देऊ नये, यासाठी तेथील भक्तगण एकत्र येत आहेत. या वादात पोलिसांनी आत्तापर्यंत 2061 जणांना अटक केली आहे. महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. मात्र, तेथील भक्तगण सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय मान्य करत नसल्याचे दिसून येते. त्यातूनच, अद्यापही तेथील महिलांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात येत आहे. याप्रकरणी जवळपास 452 खटले दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी या मंदिरात 10 ते 50 वर्षे वयाच्या महिलांना मंदिरात प्रवेशबंदी करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने ही बंदी हटवली आहे. त्यानंतर, 17 ऑक्टोबर 2018 रोजी सर्वप्रथम महिलांना मंदिरात प्रवेश देण्यासाठी मंदिर खुले करण्यात आले. मात्र, या निर्णयाविरोधात स्थानिक भक्तांनी भूमिका घेतली आहे. 

कन्नूर येथे भाजपाच्या नवनियुक्त जिल्हा समिती सभेला संबोधित करताना, शाह यांनी केरळ सरकारला इशाराच दिला आहे. जर, राज्य सरकारने स्थानिक भक्तांन अटक करण्याचं सत्र असंच सुरू ठेवल्यास केंद्र सरकारकडून राज्य सरकार बरखास्त करण्यात येईल, असा इशाराच शहा यांनी दिला. शबरीमला प्रकरणाचा वाद मिटवण्यासाठी मुख्यमंत्री पिनरई विजयन यांचा सध्या आगीशी खेळ सुरू आहे. केरळ सरकारने आत्तापर्यंत भाजपा, आरएसएस आणि इतर पक्षांच्या मिळून 2 हजारांपेक्षा अधिक कार्यकर्त्यांना अटक केली आहे. मात्र, या सर्वात नुकसान कोणाचं होत आहे ? तुम्ही जर अयप्पा भक्तगणांविरुद्ध आक्रमक भूमिका घेत असाल, तर उद्या देश त्यांच्या बाजुने उभा राहिल, असेही शहा यांनी म्हटले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहKeralaकेरळGovernmentसरकारSabarimala Templeसबरीमाला मंदिर