शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

पाकिस्तानच्या राजकारणाला दहशतवादाचा कँसर; एस जयशंकर यांचे थेट भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 23:04 IST

S. Jaishankar on Pakistan : पाकिस्तानच्या कृत्यांमुळे फक्त आपलेच नुकसान होत नाही, तर संपूर्ण उपखंड अस्थिर होत आहे.

S. Jaishankar on Pakistan : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पुन्हा एकदा दहशतवाद्याच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानला भरकार्यक्रमात सुनावले. 'पाकिस्तान सतत दहशतवादाला पाठिंबा देतो. या दहशतवाच्या कँसरने पाकिस्तानच्या राजकारणात शिरकाव केलाय. हा त्यांची संपूर्ण राजकीय व्यवस्था खाऊन टाकतोय. पाकिस्तानच्या कृत्यांमुळे फक्त आपलेच नुकसान होत नाही, तर संपूर्ण उपखंड अस्थिर होत आहे. पाकिस्तानने दहशतवादाचा दृष्टिकोन सोडला पाहिजे,' अशी प्रतिक्रिया जयशंकर यांनी दिली.

भारत-चीन संबंधांवर भाष्ययावेळी त्यांनी भारत चीनचा मुद्दाही उपस्थित केला. ते म्हणाले, भारत आणि चीनचा एकाचवेळी उदय झाल्यामुळे संबंध संतुलित करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. पूर्वीच्या आदर्शवादी आणि दिशाभूल धोरणांमुळे सहकार्य आणि स्पर्धेला अडथळा होता, परंतु गेल्या दशकात भारताचा दृष्टिकोन बदलला आहे. 2020 च्या सीमा विवादामुळे संबंध गुंतागुंतीचे झाले, या समस्या सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

भारताची ताकद मजबूत करण्यावर भर चीनच्या वाढत्या क्षमतेमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांसाठी भारताला तयार राहण्याची गरज आहे. त्यासाठी राष्ट्रीय शक्तीचा जलद विकास होणे आवश्यक आहे. यामध्ये सीमेवरील रचना आणि समुद्राकडे होणारे दुर्लक्ष सुधारावे लागेल. तसेच, संवेदनशील भागातील अवलंबित्व कमी करावे लागेल. भारत आपली एकूण ताकद वाढवण्यावर भर देत आहे. भारताचा दृष्टिकोन परस्पर आदर, परस्पर संवेदनशीलता आणि परस्पर हितावर अवलंबून आहे. भारत-चीन संबंधांच्या दीर्घकालीन विकासाचा केवळ द्विपक्षीय संबंधांवरच नव्हे तर जागतिक व्यवस्थेवरही परिणाम होईल, असेही जयशंकर यावेळी म्हणाले. 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवादchinaचीन