शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मंदिराच्या बाहेर भीक मागत होता रशियन पर्यटक, सुषमा स्वराज यांनी दिला मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 19:54 IST

नवी दिल्ली- भारतीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पुन्हा एकदा माणुसकीचं दर्शन घडवलं आहे. मंदिराच्या बाहेर भीक मागणा-या रशियन पर्यटकाला सुषमा स्वराज यांनी मदतीचा हात दिला आहे. भारतात आलेल्या इवनगेलीन नावाच्या पर्यटकाजवळचे पैसे संपले होते व त्याच्या एटीएमचा पिन नंबरही ब्लॉक झाला होता. त्यामुळे कांचीपूरममधल्या एका मंदिराच्या बाहेर तो पर्यटक भीक ...

नवी दिल्ली- भारतीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पुन्हा एकदा माणुसकीचं दर्शन घडवलं आहे. मंदिराच्या बाहेर भीक मागणा-या रशियन पर्यटकाला सुषमा स्वराज यांनी मदतीचा हात दिला आहे. भारतात आलेल्या इवनगेलीन नावाच्या पर्यटकाजवळचे पैसे संपले होते व त्याच्या एटीएमचा पिन नंबरही ब्लॉक झाला होता. त्यामुळे कांचीपूरममधल्या एका मंदिराच्या बाहेर तो पर्यटक भीक मागण्यासाठी हतबल झाला.इवनगेलीनला कांचीपूरममधल्या श्रीसुब्रमण्यम स्वामी मंदिराच्या बाहेर भीक मागताना पाहून स्थानिक लोक हैराण झाले. त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्या तरुणाला पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. पोलिसांनी चौकशी केली असता इवनगेलीनजवळ व्यक्तिगत माहितीची सापडलेली कागदपत्रे योग्य होती. त्यानंतर पोलिसांनी याची माहिती परराष्ट्र खात्याला दिली. 

हे सर्व समजल्यानंतर इवनगेलीनच्या मदतीसाठी सुषमा स्वराज पुढे आल्या असून, त्यांनी मदत करण्याचंही जाहीर केलं आहे. ट्विट करत त्या म्हणाल्या, इवनगेलीन, तुमचा देश आमचा मित्र देश आहे. चेन्नईमधील माझे अधिकारी तुमची शक्य तितकी मदत करतील. पोलिसांनी सांगितलं की, तामिळनाडू फिरण्यासाठी आलेल्या 24 वर्षीय रशियन तरुणाच्या एटीएमचं पिन लॉक झालं. त्यामुळे तो पैसे काढून शकला नाही व त्याला भीक मागावी लागली. यापूर्वीही परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना मदत केली आहे.

ट्विटरच्या माध्यमातून नेहमी सक्रिय असणा-या केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानसोबतच्या कटू संबंधांना आड येऊन न देता पाकिस्तानी नागरिकांना मदतीचा हात दिला होता. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अद्यापही ताणलेले असून संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत भाषण करताना सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावत जागा दाखवून दिली होती. मात्र याचा परिणाम सुषमा स्वराज यांनी नागरिकांवर तसंच आपल्या कामावर होऊ दिलेला नाही. मेडिकल व्हिसासाठी विनंती करण-या दोन पाकिस्तानी नागरिकांना सुषमा स्वराज यांनी काही तासात उत्तर देत व्हिसा देण्याचं आश्वासन दिलं.  लाहोरमधील उजैर हुमायून यांनी आपल्या तीन वर्षीय मुलीच्या उपचारासाठी मेडिकल व्हिसा देण्याची विनंती केली होती. त्यांच्या मुलीला ह्रदयाचा आजार असून त्यासाठी त्यांना भारतात येऊन उपचार करायचे होते. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी सुषमा स्वराज यांच्याकडे व्हिसासाठी विनंती केली होती. 'माझ्या तीन वर्षाच्या मुलीची हार्ट सर्जरी करणं गरजेचं आहे. कृपया आम्हाला व्हिसा द्यावा. आम्ही तुमचे आभारी राहू', असं ट्विट त्यांनी केलं होतं.

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराज