शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Russia-Ukrain: बांग्लादेशच्या नागरिकांची युक्रेनमधून सुटका, PM हसीनांनी मानले मोदींचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 17:36 IST

भारत सरकारने ऑपरेशन गंगा ही मोहित राबवत देशातील नागरिकांना भारतात परत आणले. पंतप्रधान मोदींनी 4 केंद्रीयमंत्र्यांना युक्रेनसीमेनजीकच्या देशांमध्ये पाठवले होते.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आज १४ वा दिवस आहे. महत्वाची बाब अशी की दोन्ही देशांच्या नेतृत्त्वानं आता नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. याच संदर्भात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं अत्यंत महत्वाचं विधान समोर आलं आहे. युक्रेन सरकार हटवण्याचा कोणताही इरादा नसल्याचं पुतीन यांनी म्हटलं. त्यामुळे, अनेकांचा जीव भांड्यात पडला आहे. मात्र, या युद्धाचे जगभरातील देशांवर परिणाम झाले आहेत. भारताचे जवळपास 20 हजार नागरिक युक्रेनमध्ये अडकले होते. 

भारत सरकारने ऑपरेशन गंगा ही मोहित राबवत देशातील नागरिकांना भारतात परत आणले. पंतप्रधान मोदींनी 4 केंद्रीयमंत्र्यांना युक्रेनसीमेनजीकच्या देशांमध्ये पाठवले होते. वायू दलाच्या सैन्यानेही या मोहिमेत मोठं योगदान दिलं. युक्रेनच्या विविध शहरात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यात सरकारला यश आलं आहे. भारतासह इतरही देशातील विद्यार्थ्यांना भारत सरकारने मदत केली आहे. बांग्लादेशच्या 9 नागरिकांना युक्रेनमधून बाहेर काढण्यास भारत सरकारने मदत केली. त्याबद्दल बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. 

भारताने ऑपरेशन गंगा द्वारे भारतासह, नेपाळ, पाकिस्तान, ट्युनीशियासह अन्य देशातील नागरिकांना युक्रेनमधून बाहेर काढले आहे. विशेष म्हणजे एका पाकिस्तानी मुलीने युक्रेनच्या कीव्ह शहरातून सुखरुप सुटका केल्याबद्दल भारतीय दुतावास आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. 

पाकिस्तानच्या मुलीने मानले आभार

व्हिडिओमध्ये ती मुलगी 'माझे नाव अस्मा शफीक आहे आणि मी पाकिस्तानची आहे' असे म्हणताना दिसत आहे. मी कीवमधील भारतीय दूतावास आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानू इच्छितो, त्यांनी मला कीवमधून बाहेर पडण्यास मदत केली. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय अधिकाऱ्यांनी अस्माला युद्धग्रस्त भागातून सुरक्षितपणे बाहेर काढण्याची आणि पश्चिम युक्रेनला पाठवण्याची व्यवस्था केली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाBangladeshबांगलादेश