शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War: आता रशियासोबत शांतता वार्ता नाही, प्रत्युत्तर देणार, युक्रेनचे राष्ट्रपती जेलेन्स्की भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 07:35 IST

Russia Ukraine War: लष्करी मदत वेळेत मिळाली असती तर हजाराे लाेकांचे प्राण आम्ही वाचवू शकलाे असताे, अशा शब्दांमध्ये जेलेन्स्की यांनी नाराजी व्यक्त केली. हा नरसंहार पाहून आता शांतता चर्चा हाेण्याची शक्यता कमी असून, युक्रेन या हत्यांचा बदला जरूर घेईल, असा इशारा जेलेन्स्की यांनी दिला.

कीव्ह/माॅस्काे : युक्रेनच्या बुका शहरात रशियन सैन्याने केलेल्या भीषण नरसंहाराचे खापर राष्ट्रपती वाेलाेदिमीर जेलेन्स्की यांनी पाश्चिमात्य देशांवर फाेडले आहे. लष्करी मदत वेळेत मिळाली असती तर हजाराे लाेकांचे प्राण आम्ही वाचवू शकलाे असताे, अशा शब्दांमध्ये जेलेन्स्की यांनी नाराजी व्यक्त केली. हा नरसंहार पाहून आता शांतता चर्चा हाेण्याची शक्यता कमी असून, युक्रेन या हत्यांचा बदला जरूर घेईल, असा इशारा जेलेन्स्की यांनी दिला.

रशियन सैन्याने सुमी व इतर शहरांमध्येही अशाच प्रकारे नरसंहार केल्याचे समाेर आले आहे. बुका शहरात दाखल झालेले जेलेन्स्की यांनी हा नरसंहार पाहून संताप व्यक्त केला. रशियाचे क्राैर्य पाहून त्यांनी शांतता चर्चा हाेण्याची शक्यता फेटाळली. ते म्हणाले, की युक्रेन रशियाला जाेरदार प्रत्युत्तर देणार असून, दृढ संकल्पाने प्रतिहल्ले करील.  पाश्चिमात्य देशांनी आधीच लष्करी मदत केली असती तर हजाराे जणांचे प्राण वाचले असते. 

फ्रान्स, जर्मनीवर डागली तोफ - जेलेन्स्की यांनी फ्रान्स आणि जर्मनीच्या नेत्यांवर ताेफ डागली. एका व्हिडिओ संदेशामध्ये ते म्हणाले, की या नेत्यांनी बुकामध्ये येऊन रशियन अत्याचाराचे चित्र पाहावे.- गेल्या १५ वर्षांमध्ये त्यांच्या रशियासाठी पाेषक धाेरणांमुळे काय झाले, हेदेखील पाहावे. -  युक्रेनला नाटाेचे सदस्यत्व न देण्याची भूमिका फ्रान्स आणि जर्मनीने घेतली आहे. मात्र, यामुळे रशियालाच फायदा हाेत असल्याचे जेलेन्स्की म्हणाले.

रशियाची डाेनबासवर हल्ल्याची तयारीशांतता चर्चा सुरू झाल्यानंतर कीव्ह शहरातून माघार घेणारे रशियन सैन्य पुन्हा एकत्र येत असून, त्यांची डाेनबासवर हल्ल्याची तयारी असल्याचा दावा युक्रेनच्या लष्कराने केला आहे.त्यांच्या माहितीनुसार, डाेनेत्स्क आणि लुहान्स्क या प्रांतांवर पूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी सैन्याने तयारी सुरू केलीआहे.मारियुपाेलवर पूर्ण नियंत्रण मिळविण्याचे रशियाचे प्रयत्न आहेत.याशिवाय पोपासना आणि रुबिइने या शहरांना ताब्यात घेण्याचा रशियाचा इरादा आहे. या प्रांतांना रशियाने स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे.

 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्ध