शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतातील डायमंड सिटीची चमक हरवली; 20 लाख लोकांच्या नोकरीवर संकट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 17:52 IST

Russia-Ukraine War: तापी नदीच्या मुखाशी असलेले हे शहर मुळात बंदर शहर म्हणून वसले होते, परंतु स्वातंत्र्यानंतर 60 आणि 70 च्या दशकात या शहराला डायमंड सिटीचा दर्जा मिळाला.

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून जगात बऱ्याच महागल्या आहेत. गव्हापासून ते कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. पण भारतामध्ये असे एक शहरदेखील आहे, ज्याची 'हिऱ्या'सारखी चमक या युद्धामुळे हरवत चालली आहे. याचा परिणाम म्हणजे या शहरात काम करणाऱ्या सुमारे 20 लाख लोकांवर उदरनिर्वाहाचे संकट निर्माण झाले आहे.

सुरतच्या 'हिरे उद्योगा'ची अवस्था वाईट आम्ही भारताच्या सुरतमधील डायमंड सिटीबद्दल बोलत आहोत. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे या शहरात हिरे पॉलिशिंगच्या कामात गुंतलेल्या सुमारे 20 लाख हिरे कारागिरांच्या रोजीरोटीचे संकट निर्माण झाले आहे. एएफपीने आपल्या एका वृत्तात अशा अनेक मजुरांची शोकांतिका सांगितली आहे. सुरतच्या स्थानिक कामगार संघटनेच्या अंदाजानुसार सुरतमध्ये आतापर्यंत 30,000 ते 50,000 हिरे कारागिरांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. तर या कामावर अवलंबून असलेल्यांची संख्या 15 ते 20 लाखांपर्यंत आहे.

रशिया रत्नांचा सर्वात मोठा पुरवठादारसुरतमधील या संकटाचे कारण म्हणजे रशियावर लादलेले आंतरराष्ट्रीय आर्थिक निर्बंध. या निर्बंधांमुळे भारताला रशियाकडून हिरे आणि इतर अनेक गोष्टी आयात करणे कठीण झाले आहे. रशिया हा भारताचा सर्वात मोठा पुरवठादार आहे. सुरतचे व्यापारी सुमारे 27 टक्के रफ हिरे रशियाकडून आयात करतात. पण, आता युद्धामुळे यावर मोठा परिणाम होत आहे. 

60 च्या दशकात बांधली डायमंड सिटीपोर्तुगीजांच्या काळात सुरतला मोठी ओळख मिळाली. तापी नदीच्या मुखाशी असलेले हे शहर मुळात बंदर शहर म्हणून वसले होते, परंतु स्वातंत्र्यानंतर 60 आणि 70 च्या दशकात या शहराला डायमंड सिटीचा दर्जा मिळाला. जगातील 90% हिरे सुरतमध्येच कापले जातात आणि पॉलिश केले जातात. सूरत हे कपड्यांच्या घाऊक व्यापाराचेही मोठे केंद्र आहे. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाGujaratगुजरातSuratसूरत