शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War: अणुयुद्ध झाल्यास अर्ध्या तासात १० कोटी मृत्यू, १८ हजार वर्षे मागे जाईल जग, मुंबईसारख्या शहरात होईल मृत्यूचं तांडव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 10:32 IST

Russia Ukraine War: आजच्या आधुनिक जगात अणुयुद्ध झाल्यास काय होईल, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. एका संस्थेने वर्तवलेल्या अंदाजानुसार एक अणुबॉम्ब क्षणार्धात लाखो लोकांचा बळी घेईल. तसेच जर १० किंवा शेकडो अणुबॉम्ब पडले तर केवळ लाखो-करोडो लोकांचा मृत्यू होईल, तसेच पृथ्वीवरील वातावरणही बिघडेल.

नवी दिल्ली -  रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षांमुळे अणुयुद्ध पेटण्याची भीती बळावली आहे. युक्रेनमधील रशियाचे आक्रमण निर्णायक टप्प्यावर आले आहे. मात्र धोका अद्याप टळलेला नाही. त्यातच कुठल्याही बाहेरील देशाने या युद्धात उडी घेतल्यास या आधी कधी पाहिले नसतील असे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिला आहे. त्यामुळे संरक्षण तज्ज्ञ पुतीन यांच्या या इशाऱ्याकडे अणुयुद्धाची धमकी म्हणून पाहत आहेत.

त्यामुळे आजच्या आधुनिक जगात अणुयुद्ध झाल्यास काय होईल, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. स्वित्झर्लंडमधील इंटरनॅशनल कॅम्पेन टू अबॉलिश न्यूक्लिअर वेपन (ICAN) या संस्थेला २०१७ मध्ये नोबेल पीस प्राईज मिळाले होते. या संस्थेने वर्तवलेल्या अंदाजानुसार एक अणुबॉम्ब क्षणार्धात लाखो लोकांचा बळी घेईल. तसेच जर १० किंवा शेकडो अणुबॉम्ब पडले तर केवळ लाखो-करोडो लोकांचा मृत्यू होईल, तसेच पृथ्वीवरील वातावरणही बिघडेल.

ICAN च्या रिपोर्टनुसार एक अणुबॉम्ब संपूर्ण शहराला नष्ट करेल. जर आजच्या काळात अनेक अणुबॉम्बचा वापर झाल्यास यामध्ये कोट्यवधी लोक मारले जातील. तसेच अमेरिका आणि रशियामध्ये अणुयुद्ध सुरू झाल्यास मरणाऱ्यांची संख्या १० कोटींपेक्षा अधिक असेल.

त्यातच मुंबईसारख्या दाट लोकसंख्येच्या जिथे दर चौरस किमीमध्ये एक लाखांपेक्षा अधिक लोक राहतात. अशा शहरात हिरोशिमासारखा अणुबॉम्ब पडल्यास एका आठवडाभरात ८.७० लाख पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जर अमेरिका आणि रशियामध्ये अणुयुद्ध झाल्यास ५०० अणुबॉम्बचा वापर केला गेला तर अर्ध्या तासात १० कोटींपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू होईल.सध्या जगात असलेल्या अण्वस्त्रांपैकी १ टक्का जरी अण्वस्त्रांचा वापर झाला, तर दोन अब्ज लोकांना उपासमारीचा सामना करावा लागेल. संपूर्ण जगातील आरोग्य व्यवस्था बिघडेल. जखमींना उपचार मिळणार नाहीत.

हिरोशिमावर पडलेल्या अणुबॉम्बसारखे १०० अणुबॉम्ब वापरले गेले, तर जगातील संपूर्ण व्यवस्था बिघडेल. जगातील संपूर्ण वातावरण बिघडेल. शेतीवर विपरीत परिणाम होतील. अणुयुद्ध झाल्यास पृथ्वीच्या पृष्टभागावर मोठ्या प्रमाणात धूर जमा होईल. त्यामुळे तापमान दोन अंशांनी घटेल. तसेच जागतिक पर्जन्यमानात ४५ टक्क्यांनी घट होईल. पृथ्वीच्या पृष्टभागावर काही ठिकाणी उणे ७ ते उणे आठ एवढे तापमान होईल. त्यामुळे १८ हजार वर्षांपूर्वी आलेल्या हिमयुगासारखी परिस्थिती निर्माण होईल.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्धMumbaiमुंबईInternationalआंतरराष्ट्रीय