शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Russia-Ukraine Conflict: रशिया-युक्रेन युद्धामुळे युरोप, अमेरिका प्रवास महागला; उड्डाणे अन्य मार्गे वळविल्याने फेरा वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 06:15 IST

Russia-Ukraine Conflict: रशिया-युक्रेनदरम्यानच्या युद्धाची झळ पूर्वेकडील देशांना पश्चिमेला जोडणाऱ्या हवाई सेवेला बसली आहे.

शरद गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली:  रशिया-युक्रेनदरम्यानच्या युद्धाची झळ पूर्वेकडील  देशांना पश्चिमेला जोडणाऱ्या हवाई सेवेला बसली आहे. या दोन्ही देशांनी आपापली हवाई हद्द बंद केल्याने  अनेक विमानसेवा कंपन्यांनी अनेक उड्डाणे एक तर  रद्द केली आहेत किंवा अन्यमार्गे वळविली आहेत. परिणाम  युरोप आणि अमेरिकेपर्यंतचा हवाई प्रवास खूपच महागला असून प्रवासाचे अंतरही वाढले आहे.  

अमेरिकी, ब्रिटिश आणि युरोपीयन एअरलाईन्सला रशियाने २५ फेब्रुवारीपासून आपल्या विमानतळांचा आणि हवाई हद्दीचा वापर करण्यास बंदी केली आहे. युरोपीय संघानेही  रशिया, बेलारुस, जॉर्जिया, युक्रेन आणि माल्डोवाचा प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी इशारा जारी केला आहे.

तथापि, भारतातून रशियाला  एअर इंडिया आणि एअरोफ्लॅाटची उड्डाणे होत आहेत; परंतु, अमेरिकेच्या  युनायटेड एअरलाईन्सने मुंबईकडची उड्डाणे रद्द केली आहेत. तुर्कीश एअरलाईन्सची दिल्लीची उड्डाणे रद्द झाली आहेत. रशिया आणि आसपासच्या देशांची हवाई हद्द बंद असल्याने बव्हंशी विमाने इराण, इराक आणि तुर्कीवरून जात आहेत. त्यामुळे प्रवास तीन तासांनी वाढला आहे. शिवाय या हवाईमार्गावर वाहतूकही वाढली आहे. त्यामुळे येथे उतरणाऱ्या विमानांना खूप वेळ  वाट पाहावी लागते.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाairplaneविमान