शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine Conflict : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना रोमानियामार्गे एअरलिफ्ट, एअर इंडियाची 2 विमाने उद्या रवाना होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 17:42 IST

Russia Ukraine Conflict : ही दोन्ही विमाने शनिवारी पहाटे दोन वाजता उड्डाण करण्यास सुरुवात करतील. ही विमाने रोमानियाची राजधानी बुखारेस्ट मार्गे लोकांना एअरलिफ्ट (AIRLIFT) करणार आहेत. 

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो भारतीयांसाठी आनंदाची बातमी आहे. या लोकांच्या सुटकेसाठी भारत सरकारने एअर इंडियाची 2 विमाने पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ही दोन्ही विमाने शनिवारी पहाटे दोन वाजता उड्डाण करण्यास सुरुवात करतील. ही विमाने रोमानियाची राजधानी बुखारेस्ट मार्गे लोकांना एअरलिफ्ट (AIRLIFT) करणार आहेत. 

आधीच भारतीय बचाव पथके रोमानियाच्या सीमेवर पोहोचली आहेत, तेथून युक्रेनची राजधानी कीव्ह येथे फक्त 12 तासांच्या ड्रायव्हिंगने पोहोचता येते. बचाव पथक भारतीय लोकांना बुखारेस्टला आणणार आहे. त्यानंतर भारतीय नागरिकांसाठी सुरक्षितपणे मायदेशी परतण्यासाठी बुखारेस्ट येथून विशेष विमाने असणार आहेत. 

गुरुवारी परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या कुटुंबीयांना आश्वासन दिले होते की भारत सरकार तेथे अडकलेल्या जवळपास 18,000 भारतीयांना परत आणण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे. युक्रेनमध्ये हवाई उड्डाण बंद असल्याने पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे.

दरम्यान, शुक्रवारी अनेक भारतीय नागरिकांनी कीव्हमधील भारतीय दूतावासात आश्रय घेतला. दूतावासाच्या परिसरात गोळीबार झाल्याचेही वृत्त आहे, मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नाही. भारतीय दूतावासाने भारतीय लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांना लवकरच पर्यायी मार्गाने बाहेर काढण्याची योजना आखली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाInternationalआंतरराष्ट्रीय