शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

रशिया-युक्रेन युद्धात 12 भारतीयांचा मृत्यू, 16 बेपत्ता; परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 19:19 IST

Russia-Ukraine : रशियन सैन्यात लढताना या सर्व भारतीयांचा मृत्यू झाला आहे.

Russia-Ukraine : मागील अनेक महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. सध्या युद्धाची दाहकता कमी झाली असली तरी, अधुन-मधून दोन्ही बाजूने हल्ले केले जातात. दरम्यान, या युद्धाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. या युद्धात किमान 12 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण रशियन सैन्य दलात सेवा देत होते. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी(17 जानेवारी) ही माहिती दिली. 

16 भारतीय अद्याप बेपत्ताभारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, रशियन सैन्यात कार्यरत असलेल्या भारतीय नागरिकांची 126 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यापैकी 96 लोक भारतात परतले आहेत, रशियन सशस्त्र दलातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पण, अजूनही 18 भारतीय नागरिक रशियात असून, त्यापैकी 16 बेपत्ता आहेत. रशियाने त्यांना बेपत्ता घोषित केले आहे. आम्ही इतरांची तात्काळ सुटका आणि मायदेशी परत पाठवण्याची मागणी करत आहोत.

केरळच्या तरुणाचा मृत्यूया आठवड्याच्या सुरुवातीला युद्धात सामील असलेल्या केरळमधील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. तसेच, त्याचा नातेवाईक गंभीर जखमी झाला आहे. दोघेही केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील वडक्कनचेरी येथील रहिवासी आहेत. बिनिल टीबी असे मृताचे नाव आहे, तर जैन टीके असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. बिनिलच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करताना जयस्वाल म्हणाले की, बिनील टीबीचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. आमचे दूतावास रशियन अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, पार्थिव लवकरात लवकर भारतात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. जखमी झालेल्या जैनवर मॉस्कोमध्ये उपचार सुरू आहेत. उपचार पूर्ण करून तो लवकरच भारतात परतेल, अशी अपेक्षा आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने भारतीयांच्या सुटके मागणी केलीअनेक भारतीय तरुण रशियाच्या लष्करी सहाय्य सेवेत इलेक्ट्रिशियन, कुक, प्लंबर आणि ड्रायव्हर म्हणून काम करण्याच्या आशेने एप्रिलमध्ये रशियाला गेले होते. जयस्वाल म्हणाले की, आम्ही दिल्लीतील रशियन दूतावासाकडे या प्रकरणाची चर्चा केली आहे. आम्ही उर्वरित भारतीय नागरिकांची लवकर सुटका करण्याच्या आमच्या मागणीचाही पुनरुच्चार केला आहे. सर्व भारतीय लवकरच परत येतील अशी आशा आहे.

टॅग्स :russiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाIndiaभारत