शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

रशियाने भारतीयांची भरती थांबवावी, भारताची स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 07:03 IST

Russia Ukrain War: युक्रेन युद्धात रशियाच्या सैन्यात तैनात असलेल्या आणखी २ भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली. त्यानंतर भारताने स्पष्ट भूमिका घेत रशियाने कोणत्याही परिस्थितीत आपल्या सैन्यात भारतीयांची भरती थांबवावी. हा प्रकार दोन्ही देशांच्या भागीदारीसाठी चांगला नाही, असे मत व्यक्त केले आहे. 

 नवी दिल्ली -  युक्रेन युद्धात रशियाच्या सैन्यात तैनात असलेल्या आणखी २ भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली. त्यानंतर भारताने स्पष्ट भूमिका घेत रशियाने कोणत्याही परिस्थितीत आपल्या सैन्यात भारतीयांची भरती थांबवावी. हा प्रकार दोन्ही देशांच्या भागीदारीसाठी चांगला नाही, असे मत व्यक्त केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, मॉस्कोमधील भारतीय दुतावासाने दोन्ही भारतीय नागरिकांचे मृतदेह लवकरात लवकर परत आणण्यासाठी रशियाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणला आहे. मंत्रालयाने भारतीयांना रशियामध्ये नोकरीच्या संधी चालून आल्यास सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. सरकारने भारतीयांना परत पाठवण्याची मागणी केली आहे.

आतापर्यंत अनेक भारतीयांचा मृत्यू- रशियाच्या सैन्यात भरती झालेल्या अनेक भारतीय नागरिकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. एप्रिलमध्ये भारताची तपास यंत्रणा सीबीआयने रशिया-युक्रेन युद्धात भारतीयांना फसवणूक करून पाठवल्याप्रकरणी ४ जणांना अटक केली होती. - त्यातील तीन जण भारतातील होते, तर एकजण रशियाच्या संरक्षण मंत्रालयात काम करणारा अनुवादक होता. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, दिल्लीस्थित व्हिसा कंपनीने आतापर्यंत सुमारे १८० भारतीयांना रशियाला पाठविले आहे.

१ लाख रुपये पगाराचे आमिषतपास यंत्रणेने सांगितले होते की, दिल्लीतील व्हिसा कन्सल्टन्सी कंपन्या परदेशात काम करण्याची इच्छा असलेल्यांना लक्ष्य करतात. त्यानंतर त्यांना फसवण्यासाठी यूट्यूब व्हिडिओ बनविले जातात. 

भरती होण्याची बळजबरी- व्हिडीओमध्ये नोकरी करणाऱ्या लोकांना युद्ध लढण्यासाठी सीमेवर जावे लागणार नाही. त्यांना ३ महिने प्रशिक्षण दिले जाणार असून, त्यादरम्यान त्यांना ४० हजार रुपये पगार मिळणार आहे.- प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पगार एक लाख रुपये असेल, असा दावा करण्यात येतो. सैन्यात सामील झाले नाहीत तर १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल, अशी तरतूद असलेली गदपत्रे दाखवून धमकावले जाते.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाIndiaभारत