नवी दिल्ली - १९७१ च्या युद्धात भारताला घेरण्यासाठी आणि सैन्य तळावर हल्ला करण्यासाठी अमेरिकेचे न्यूक्लियर पॉवर्ड एअरक्राफ्ट USS एंटरप्राईज बंगालच्या खाडीच्या दिशेने येत होते. पूर्वीचे पाकिस्तान म्हणजे आताचे बांगलादेश इथं भारताने पोहचू नये असं अमेरिकेला वाटत होते. त्यासाठी एअरक्राफ्ट कॅरिअर इंटरप्राइजला बंगालच्या खाडीत तैनात करून रवाना करण्यात आले होते. तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी त्यांच्या सैन्याला थेट भारतीय सैन्य तळावर हल्ला करण्याची परवानगी दिली होती.
अमेरिकेच्या या खेळीला चोख उत्तर देण्यासाठी रशिया भारताच्या मदतीला पोहचली त्यामुळे अमेरिकेला पळावं लागले. अमेरिका भारतासोबत काय करणार आहे हे रशियाने आधीच सूचित केले होते. त्यावेळी भारतानेही आमचे वॉलंटियर फायटर पायलट अमेरिकन एअरक्राफ्ट कॅरिअर इंटरप्राईज आत्मघातकी हल्ल्यासाठी तयार ठेवले होते.
रशियाच्या एका पाऊलाने युद्धाची दिशा बदलली
रशियाने १९७१ च्या युद्धावेळी खतरनाक चाल खेळली. सोवियत नौसेना प्रमुख एडमिरल गोर्श्कोव यांनी त्यांच्या न्यूक्लियर पॉवर्ड सबमरीनला पाण्याच्या वरील बाजूस आणले. ज्यामुळे अमेरिकन सॅटेलाईट त्याचा फोटो काढू शकेल. रशियाच्या नौसेनेने क्रुझ मिसाईल लेन्स पाणबुड्या बंगालच्या खाडीजवळील समुद्रात पाण्याच्या वरच्या बाजूस दिसतील अशा आणल्या. त्यानंतर जे रशियाला हवं होते तेच झाले. अमेरिकन सॅटेलाईटने हा फोटो घेतला.
दरम्यान, अमेरिकेने सॅटेलाईट फोटोत बंगालच्या खाडीजवळ रशियाच्या न्यूक्लियर सबमरीन तैनात आहेत हे पाहिले आणि त्यांना धक्का बसला. अमेरिकन नौदल घाबरले. जर त्यांनी भारतावर हल्ला केला तर रशियाची पाणबुडी अमेरिकन सैन्यावर हल्ला करेल. अमेरिकेला रशियासोबत युद्ध नको होतं. त्यामुळे अमेरिकेने त्यांच्या एअरक्राफ्टला दिशा बदलायला सांगितली आणि ते श्रीलंकेच्या दिशेने गेले.
१३ दिवसांत युद्ध संपलं
३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने भारतावर हल्ला केला होता परंतु भारतीय सैन्याने त्यांना चोख उत्तर दिले. जनरल मानेकशा यांच्या नेतृत्वात अवघ्या १३ दिवसांत पाकिस्तानला तोंडघशी पडावे लागले. १६ डिसेंबरला भारताने बांगलादेशाला पूर्व पाकिस्तानपासून स्वातंत्र मिळवून दिले. या युद्धात ९१ हजार पाक सैनिक भारताने पकडले परंतु पाकिस्तान सरकारच्या निवेदनानंतर भारताने त्यांना सोडून गेले. या युद्धात रशियाने भारताला साथ दिली नसती तर अमेरिका आणि पाकिस्तान यांच्या दुहेरी संकटात भारत अडकला असता.