शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूर हिंसाचार : विमानतळावर बस स्टँडसारखे दृश्य; 2500 रुपयांचे तिकिट मिळतंय 25,000 रुपयांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 14:39 IST

शहरातून बाहेर पडणाऱ्या लोकांची संख्या पाहता, विमानतळ सार्वजनिक बस स्टँड किंवा रेल्वे स्टेशनसारखे दिसते होते. बरेच लोक आपल्या विमानाची वाट पाहत जमिनीवर झोपलेले आणि बसलेले दिसून येत आहेत.

मणिपूरमधील हिंसाचारामुळे तेथून घरी परतणाऱ्यांची संख्या अचानक अनेक पटींनी वाढली आहे. यामुळे इंफाळ ते कोलकाता विमान भाडे 25,000 रुपयांपर्यंत पोहोचले आहे, जे सामान्य किमतींपेक्षा 8 पट जास्त आहे. साधारणपणे, दोन शहरांमधील विमान प्रवासाचे भाडे जवळपास 2500 ते 3000 आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात हिंसाचार सुरू झाल्यापासून, राज्यात राहणारे कोलकाताचे लोक कोणत्याही मार्गाने आपल्या घरी परतण्याची घाई करत आहेत.

इंफाळ विमानतळाबाहेर हजारो लोक आपल्या फ्लाइटची वाट पाहत होते. दुसरीकडे, इंफाळ आणि कोलकाता दरम्यान उड्डाण करणार्‍या विमान कंपन्यांनी सांगितले की, कोलकाता येथे जाणारी सर्व उड्डाणे सुरू आहेत. तसेच, ट्रॅव्हल एजंट म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीमुळे पुढील काही दिवस विमान भाडे कमी होण्याची शक्यता नाही. याशिवाय, काही विमान कंपन्यांनी सांगितले की, लोकांची मागणी पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त उड्डाणे चालविण्यात येत आहे.

दरम्यान, शहरात अजूनही इंटरनेट बंद आहे, दुकानेही बंद असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र, रविवारी बाजारपेठा आणि दुकाने काही तास खुली होती. परंतु या काळात लोकांच्या हालचालींवर मोठ्या प्रमाणात मर्यादा आल्या होत्या आणि फक्त विमान तिकीट असलेले लोक घराबाहेर पडत होते. शहरातून बाहेर पडणाऱ्या लोकांची संख्या पाहता, विमानतळ सार्वजनिक बस स्टँड किंवा रेल्वे स्टेशनसारखे दिसते होते. बरेच लोक आपल्या विमानाची वाट पाहत जमिनीवर झोपलेले आणि बसलेले दिसून येत आहेत.

इंफाळ ते कोलकाता फ्लाइट फुलविमानतळ प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, 4 मे ते 6 मे दरम्यान इंफाळ विमानतळावरून 108 उड्डाणे झाली. यादरम्यान, प्राधिकरणाने विमानतळावर बाजारभावाने वस्तूंची विक्री करणारे विशेष खाद्य आणि स्नॅक्स काउंटर देखील उघडले. येथे काही अडकलेल्या प्रवाशांना मोफत अन्न आणि पाण्याचेही वाटप करण्यात आले. तसेच, कोलकाता विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, इंफाळहून सुटणारी सर्व उड्डाणे फूल आहेत आणि तिकिटांची मागणी लक्षणीय वाढली आहे. इंडिगोने शनिवारी दोन विशेष उड्डाणे इम्फाळ ते कोलकाता आणि रविवारी अतिरिक्त एटीआर उड्डाणे चालवली.

टॅग्स :airplaneविमान