शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

जीव वाचवण्यासाठी पळताना मी पडले आणि...; मणिपूरातील बलात्कार पीडितेची भयावह कहाणी समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 06:51 IST

चुराचंदपूर (मणिपूर) : ‘मी जीव वाचवण्यासाठी पळताना पडले, वहिनीने माझ्या मुलांना कसेबसे वाचवून सुरक्षितस्थळी नेले. परंतु, मला पुरुषांच्या एका ...

चुराचंदपूर (मणिपूर) : ‘मी जीव वाचवण्यासाठी पळताना पडले, वहिनीने माझ्या मुलांना कसेबसे वाचवून सुरक्षितस्थळी नेले. परंतु, मला पुरुषांच्या एका गटाने पकडले आणि सामूहिक बलात्कार केला,’ असा आरोप जिल्ह्यातील एका ३७ वर्षीय विवाहित महिलेने केल्यानंतर मणिपूर हिंसाचारात दबलेली आणखी एक भयावह घटना पुढे आली आहे. 

मणिपूरमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या वांशिक संघर्षांदरम्यान लैंगिक अत्याचाराच्या आणखी एका भीषण घटनेत, मदत शिबिरात राहणाऱ्या पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ताज्या प्रकरणात, या महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, ३ मे रोजी जमावाने तिचे घर जाळल्यानंतर ती तिच्या दोन मुले, भाची आणि वहिनीसह पळून जात होती. त्या वेळी ती पळता पळता पडली आणि पुरुषांच्या तावडीत सापडली. इतर कसेबसे पळून जाण्यात यशस्वी झाले; परंतु, तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला.

डॉक्टरांमुळे मिळाले तक्रारीचे बळमहिलेने सांगितले की, सामूहिक बलात्कारानंतर प्रकृतीचा त्रास वाढल्याने मंगळवारी ती इंफाळमधील जेएनआयएमएस रुग्णालयात गेली. तेथे डॉक्टरांनी तिच्यावर उपचार आणि समुपदेशन केले, ज्यामुळे तिला या प्रकरणाची तक्रार करण्याचे बळ मिळाले. 

महिलांनी इंफाळमध्ये मशाल रॅली काढलीइंफाळ : संसदेचे पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी मणिपूर विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करत शेकडो महिलांनी बुधवारी रात्री इंफाळ खोऱ्यात मशाल मोर्चा काढला. बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील केसमपट, केसमथोंग आणि क्वाकेथेल आणि इंफाळ पूर्व जिल्ह्यातील वांगखेई आणि कोंगबा येथे मोर्चा काढण्यात आला.

कुटुंबाची बदनामी वाचवण्यासाठी गप्प बसलेमहिलेने सांगितले की, ‘माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी आणि सामाजिक बहिष्कार टाळण्यासाठी मी ही घटना उघड केली नाही. त्यामुळेच ही तक्रार दाखल करण्यास उशीर झाला आहे.  मला तर आत्महत्येची इच्छा होती.’ बुधवारी बिष्णुपूर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या ‘झिरो एफआयआर’सोबत तिने सांगितले की, ती आता विस्थापितांच्या मदत छावणीत राहत आहे. भादंविच्या कलम ३७६ डी, ३५४, १२० बी आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार