शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सरकार-पक्षामध्ये समन्वय ठेवून राज्याचा कारभार चालवा; पंतप्रधान मोदींचा भाजपशासित राज्यांच्या मुख्मयंत्र्यांना मंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 05:48 IST

भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, स्वराज्याएवढेच सुराज्यही महत्त्वाचे : मोदी

वाराणसी : सरकार आणि पक्षामध्ये समन्वय ठेवून कामकाज करण्यासाेबतच चांगल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पाेहाेचविण्याचा मंत्र पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिला. पुढील वर्षी ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका हाेणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी सर्व भाजपशासित मुख्यमंत्र्यांचे रिपाेर्ट कार्ड जाणून घेतले. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी वाराणसी दाैऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सर्व भाजपशासित मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. त्यात उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटक, मणिपूर, आसाम, गुजरात, गाेवा, हरयाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित हाेते. सरकार आणि पक्षामध्ये समन्वय नसल्याचा यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये फटका बसल्याकडे माेदींनी लक्ष वेधले. यासंदर्भात माेदींनी सूचना दिल्या, की सरकार आणि पक्ष हे दाेन प्रमुख घटक आहेत. त्यांच्यात समन्वय ठेवणे खूप आवश्यक आहे. सर्वांनी काशीमधील विकासकामांची पाहणी करावी. हे माॅडेल आपापल्या राज्यात राबवावे. आपण केलेली चांगली कामे जनतेपर्यंत पाेहाेचविण्याकडेही भर द्यावा, अशा सूचनाही माेदींनी सर्व मुख्यमंत्र्यांना दिल्या.पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांना गुड गव्हर्नंन्सवर भर देण्याचीही सूचना केली. बैठकीत सर्व मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यातील विकासकामे तसेच महत्त्वाच्या याेजनांबाबत प्रेझेंटेशन दिले तसेच भविष्यातील याेजनांचीही माहिती सर्वांनी दिली. सर्वांत माेठे प्रेझेंटेशन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ यांनी दिले. पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक हाेणार आहे. पंतप्रधान माेदी आणि याेगी आदित्यनाथ हे दाेघेही एकाच गाडीने बैठकस्थळी दाखल झाले, हे विशेष. बैठक आटाेपल्यानंतर पंतप्रधान माेदी आणि सर्व मुख्यमंत्री शाहजहापूर येथील भव्य बायाेगॅस केंद्रावर पाेहाेचले. तेथील पाहणी केल्यानंतर सर्व मान्यवर स्वरवेद मंदिरात दाखल झाले.

स्वराज्याएवढेच सुराज्यही महत्त्वाचे : माेदीदेश स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करत आहे. आज स्वराज्याएवढेच सुराज्यही महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केले. सद्गुरू सदाफलदेव विहंगम याेग संस्थेला ९८ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयाेजित समारंभात ते बाेलत हाेते. पंतप्रधानांनी नैसर्गिक शेतीवर भर देण्याचे आवाहन यावेळी केले. शून्य बजेट नैसर्गिक शेती एक जनआंदाेलन झाले पाहिजे तसेच याचे सर्व फायदे लाेकांना सांगितले पाहिजे, असे माेदी म्हणाले. दाेन वर्षांनी संस्थेची शतकपूर्ती हाेणार आहे. त्यानिमित्ताने माेदींनी देशवासीयांना दाेन संकल्प घेण्याचे आवाहन केले.

पहिला संकल्प म्हणजे, मुलींच्या शिक्षणाचा. मुलींना कौशल्य विकासासाठी सज्ज करायचे आहे. त्यासाठी ज्यांना शक्य असेल त्यांनी एक किंवा दाेन मुलींची जबाबदारी घेण्याचे आवाहनही माेदींनी केले. दुसरा संकल्प हा देशातील जलस्रोतांना शुद्ध ठेवण्याचा आहे. देशातील सर्व नद्या आणि जलस्रोतांना स्वच्छ ठेवण्याचे आवाहन मोदींनी केले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीChief Ministerमुख्यमंत्रीVaranasiवाराणसी