शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

2 हजार रुपयांची नोट बंद होणार ही अफवा, विश्वास ठेऊ नका- अरूण जेटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 09:30 IST

नोटाबंदीनंतर नव्यानं चलनात आलेली 2000 रुपयांची नोट बंद होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरु आहे.

ठळक मुद्देनोटाबंदीनंतर नव्यानं चलनात आलेली 2000 रुपयांची नोट बंद होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरु आहे. सर्व चर्चांना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पूर्णविराम दिला आहे

गांधीनगर- नोटाबंदीनंतर नव्यानं चलनात आलेली 2000 रुपयांची नोट बंद होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरु आहे. पण या सर्व चर्चांना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पूर्णविराम दिला आहे. 2 हजार रूपयांची नोट बंद होणार ही अफवा असून त्यावर विश्वास ठेवू नका, असं आवाहन अरूण जेटली यांनी केलं आहे. 

'अनेक अफवा पसरवल्या जात आहेत,पण त्या चुकीच्या आहेत. जोपर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत त्यावर विश्वास ठेऊ नका.' असं केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी गांधीनगर येथे माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

 

नेमकं प्रकरण काय ?

रिझर्व्ह बॅंकेने गेल्यावर्षी चलनात आणलेल्या दोन हजार रुपयाच्या नोटांची छपाई थांबविली आहे किंवा थांबवणार असल्याचं एका अहवालातून समोर आलं होतं. इतकंच नाही, तर रिझर्व्ह बॅंकेने दोन हजार रुपयांचा नोटा चलनात आणणंसुद्धा बंद केलं आहे, असा अंदाज देशातील सार्वजनिक क्षेत्रात असलेली स्टेट बँक ऑफ इंडियाकडून करण्यात आलेल्या संशोधन अहवालात म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेने गेल्या काही दिवसांत लोकसभेत सादर केलेल्या वार्षिक रिपोर्टच्या आधारे एसबीआय इकोफ्लॅशने आपला अहवाल मांडला. यामध्ये रिझर्व्ह बँकेने 8 डिसेंबर 2017 पर्यंत 15,78,700 कोटी रुपये मुल्य असलेल्या मोठ्या नोटांची छपाई केली आहे. यात 2,46,300 कोटी रुपये मुल्यच्या नोटा रिझर्व्ह बँकेने अद्याप व्यवहारात आणलेल्या नाहीत. यामुळे रंझर्व्ह बँक दोन हजार रुपयाच्या नोटांची छपाई थांबवू शकते, अशी चर्चा होती. तसेच 2,463 अब्ज रुपये मुल्यच्या दोन हजार रुपयाच्या नोटा जारी करण्याऐवजी 50 आणि 200 रुपयाच्या छोट्या चलनी नोटा आरबीआयकडून जारी होण्याची शक्यता आहे, असं एसबीआय समूहाच्या मुख्य आर्थिक सल्लागार सौम्या कांती यांनी आपल्या अहवालात म्हटलं होतं.

याचबरोबर अहवालानुसार, दोन हजार रुपयांच्या नोटांमुळे बाजारात व्यवहारांमध्ये मोठ्या अडचणी येत आहेत. सुट्ट्या पैशांचा प्रश्न गंभीर होत चालल्याने हळूहळू दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई रिझर्व्ह बँकेने कमी केली आहे किंवा त्या परत घेण्याच्या तयारीत आहे. तसंच सरकार आणि आरबीआय आर्थिक व्यवहारात 35 टक्के भाग हा छोट्या चलनी नोटाचा ठेवण्याच्या विचारात आहे, असा अंदाजही या अहवालात व्यक्त करण्यात आला होता.   

टॅग्स :Note BanनोटाबंदीArun Jaitleyअरूण जेटली