शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारी-विरोधकांत रंगली ईव्हीएमवरून खडाजंगी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 07:52 IST

निवडणूक आयोगाची बैठक : काँग्रेससह अन्य पक्षांचा विरोध, भाजपा ठाम

नितीन अग्रवाल/ शीलेश शर्मा ।

नवी दिल्ली : निवडणूक आयोगात सोमवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेस, व मित्रपक्ष विरुद्ध भाजप यांच्यात ईव्हीएमवरून जोरदार खडाजंगी झाली. निवडणुका ईव्हीएमद्वारे घ्याव्यात यावर भाजप ठाम असताना काँग्रेस व मित्रपक्षांनी मतपत्रिकांच्या वापराचीच मागणी केली. सहा तास चाललेल्या या बैठकीनंतर निवडणूक आयोगाने निष्पक्ष निवडणुकीचे आश्वासन दिले.

बैठकीतील ७० टक्के राजकीय पक्षांनी मतपत्रिकेचीच मागणी केली, असा दावा काँग्रेसने नंतर केला. आयोगाने राजकीय पक्षांना प्रश्नावली पाठवून, त्यावर म्हणणे मागविले होते. ईव्हीएम मशीनची दुरुस्ती व देखभाल करणाऱ्या कंपन्यांची यादी सार्वजनिक करण्याची मागणी काँग्रेस व मित्रपक्षांनी केली. निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांकडून होणारा खर्चावर बंधने आणण्याची मागणी काँग्रेसने केली. राजकीय पक्षांच्या खर्चावर मर्यादा नसल्याने अन्य पक्षांच्या तुलनेत भाजपा पाण्यासारखा पैसा खर्च करत आहे. या खर्चावर अंकुश लागत नाही, तोपर्यंत निष्पक्ष निवडणुका होणार नाहीत, असे मत काँग्रेसने मांडले. बैठकीस सात राष्ट्रीय व ५१ प्रादेशिक पक्षांचे प्रतिनिधी आले होते. काँग्रेस, सपा, बसपा, आप, सीपीएम, सीपीआय, तृणमूल काँग्रेस यांनी ईव्हीएमला आक्षेप घेतला. मतपत्रिकांचा वापर शक्य नसल्यास व्हीव्हीपॅट वापर वाढवून प्रक्रिया पारदर्शी करावी, असे त्यांचे म्हणणे होते. बीएसपीचे नेते सतीश मिश्राम्हणाले की, मतपत्रिकाच वापराव्यात. ईव्हीएमवर आमचा विश्वास नाही. काँग्रेस व आपचे म्हणणे होते की, व्हीव्हीपॅटच्या २० ते ३० टक्के मतांची ईव्हीएममधी मतांशी पडताळणी करावी. गडबडीचे अनेक प्रकार समोर आले असून, त्याचा फायदा केवळ भाजपलाच होत आहे. अनेक विकसित देशांनी पुन्हा मतपत्रिकांनीच निवडणुका सुरू केल्या आहेत.

सरकारने खर्च करावालोकसभा वगळता सर्व निवडणुकांसाठी सरकारी निधीची मागणी प्रादेशिक पक्षांनी केली. मोठ्या राजकीय पक्षांना मोठा निधी मिळतो. पण, छोट्या पक्षांना पैशांची कमतरता भासते, असे लहान पक्षांचे म्हणणे होते.मतदार यादीतील गडबडकाही पक्षांनी मतदार याद्यांतील गोंधळाचा मुद्दा मांडला. काँग्रेसने मध्य प्रदेश आणि राजस्थानचे उदाहरण देऊन, असा आरोप केला की, मध्य प्रदेशात ६० लाख आणि राजस्थानात ४५ लाख बनावट मतदार आहेत. निवडणूक आयोगानेही २४ लाख बनावट नावे ेयादीत असल्याचे मान्य केले.

टॅग्स :Electionनिवडणूकcongressकाँग्रेस