शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धाच्या हत्येविरोधात आयोजित हिंदू एकता मंचच्या कार्यक्रमात हंगामा, महिलेनं एकाला चपलेनं मारलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 15:50 IST

श्रद्धाच्या हत्येविरोधात हिंदू एकता मंचानं मंगळवारी महापंचायतचं आयोजन केलं होतं. पण या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरच हाणामारीचा प्रसंग घडला.

नवी दिल्ली- 

श्रद्धाच्या हत्येविरोधात हिंदू एकता मंचानं मंगळवारी महापंचायतचं आयोजन केलं होतं. पण या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरच हाणामारीचा प्रसंग घडला. एका महिलेनं व्यासपीठावर उपस्थित व्यक्तीला चपलेनं मारलं. यावेळी व्यासपीठावर उपस्थित इतर व्यक्तींनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. 

दिल्लीच्या छतरपूर येथे श्रद्धाला न्याय मिळावा या मागणीसह हिंदू एकता मंचानं महापंचायतीचं आयोजन केलं होतं. ही पंचायत त्याच परिसरात होती जिथं आफताबनं श्रद्धाची हत्या केली होती. बेटी बचाओ फाऊंडेशननंही या महापंचायत सभेला आपलं समर्थन दिलं होतं. 

महापंचायतच्या दरम्यान एक महिला आपली तक्रार सांगण्यासाठी व्यासपीठावर आली. पण एका व्यक्तीनं या महिलेला धक्का दिला आणि व्यासपीठावरुन खाली ढकलण्याचा प्रयत्न केला. यावरुन संतापलेल्या महिलेनं संबंधित व्यक्तीला चपलेनं मारण्यास सुरुवात केली. यावेळी व्यासपीठावर उपस्थितांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. 

आफताबवर श्रद्धाच्या हत्येचा आरोपआफताबनं श्रद्धा वालकर हिची १८ मे रोजी गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिचे ३५ तुकडे करुन ते जंगलात फेकून दिले. दोघंही ८ मे रोजी दिल्लीच्या महरौली परिसरात एका फ्लॅटमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. याआधी ते दोघंही मुंबईत वास्तव्याला होते. १८ मे रोजी श्रद्धाचं आफताबसोबत भांडण झालं होतं. यानंतर वादाचं रुपांतर हाणामारीत झालं आणि आफताबनं श्रद्धाची हत्या केली. आफताबनं श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले होते. त्यानंतर दररोज रात्री एका पिशवीतून तो तुकडे जवळच्याच एका जंगलात टाकत होता. पोलिसांनी आफताबला १२ नोव्हेंबरला अटक केली आणि त्याची १ डिसेंबर रोजी नार्को टेस्ट होणार आहे. 

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकर