शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

UN मध्ये पाकिस्तानला फटकारणाऱ्या कोण आहेत रुचिरा कंबोज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 13:18 IST

Ruchira Kamboj : संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) विशेष सत्रादरम्यान रुचिरा कंबोज यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल पाकिस्तानवर टीका केली.

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रसंघातील (United Nations) भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज (Ruchira Kamboj) यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला (Pakistan) फटकारले आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) विशेष सत्रादरम्यान रुचिरा कंबोज यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल पाकिस्तानवर टीका केली.

यावेळी रुचिरा कंबोज यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहणार असल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले. तसेच, पाकिस्तान संयुक्त राष्ट्रासारख्या मोठ्या व्यासपीठाचा गैरवापर करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान,  रुचिरा कंबोज या 1987 च्या बॅचच्या भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) अधिकारी आहेत. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या त्या पहिल्या महिला राजदूत आहेत.

भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी रुचिरा कंबोज यांनी ऑगस्ट 2022 मध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताच्या नवीन स्थायी प्रतिनिधी म्हणून पदभार स्वीकारला. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या त्या पहिल्या महिला राजदूत आहेत. रुचिरा कंबोज 1987 च्या बॅचच्या IFS अधिकारी आहेत. यापूर्वी त्या भूतानमध्ये भारताच्या राजदूत होत्या. तसेच, त्यांनी दक्षिण आफ्रिकेत भारताचे उच्चायुक्त म्हणूनही काम केले आहे. याशिवाय, 2011 ते 2014 पर्यंत त्या भारताच्या चीफ ऑफ प्रोटोकॉल म्हणून कार्यरत होत्या.

अनेक जबाबदार पदांवर काम करण्याचा अनुभवरुचिरा कंबोज यांची जून 2022 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या (UN) मुख्यालयात भारताची स्थायी प्रतिनिधी  (Permanent Representative to UN) म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी राजदूत टीएस तिरुमूर्ती यांची जागा घेतली. रुचिरा कंबोज यांनी फ्रान्समध्ये थर्ड सेक्रेटरी म्हणून कारकीर्द सुरू केली होती. 1989 ते 1991 या काळात फ्रान्समधील भारतीय दूतावासात त्यांनी थर्ड सेक्रेटरी म्हणून जबाबदारी सांभाळली होती. याचबरोर, 1991 ते 1996 पर्यंत रुचिरा कंबोज यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या युरोप पश्चिम विभागात अतिरिक्त सचिव (Upper Secretary) म्हणून काम केले. तसेच, 1987 च्या सिव्हिल सर्व्हिसेस बॅचच्या त्या अखिल भारतीय महिला टॉपर होत्या.

टॅग्स :United StatesअमेरिकाIndiaभारतPakistanपाकिस्तान