शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
3
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
4
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
6
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
7
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
8
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
9
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
10
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
11
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
12
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
13
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
15
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
16
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
17
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
18
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
19
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत

सावधान! RTO ने नियम बदलले, १ जूनपासून लागू होणार नवे रुल्स;...तर भरावा लागेल २५ हजारांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 13:48 IST

News RTO Rules 2024 : आरटीओने आपल्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. माहिती वाचून घ्या नाहीतर खिशाला कात्री लागेल.

News RTO Rules 2024 ( Marathi News ) : देशात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाहनधारकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. आरटीओने आता नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. दंडांच्या रक्कमेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागू शकते. १ जूनपासून नवीन वाहतूक नियम लागू होत आहेत. 

तुम्हाला जर दंडापासून किंवा कारवाईपासून वाचायचे असेल तर नव्या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. 

कलम ३७० हटल्यानंतर नवा रेकॉर्ड बनला; दहशतवाद्यांचा गड उद्ध्वस्त करून लोकशाही अवतरली

सरकारी प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) १ जून २०२४ पासून नवीन वाहन नियम जारी करणार आहे. नवीन नियमांनुसार, १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना वेगात गाडी चालवणाऱ्यांना २५,००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.

वेगाने गाडी चालवली तर १००० ते २००० रुपये दंड भरावा लागणार आहे.अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालवले तर २५,००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल. जर एखाद्याने परवान्याशिवाय वाहन चालवले तर ५०० रुपये दंड भरावा लागणार आहे. 

हेल्मेट न घातल्यास १०० रुपये दंड भरावा लागेल आणि सीट बेल्ट न लावल्यास १०० रुपये दंड भरावा लागेल. जर तुम्ही १८ वर्षांपेक्षा कमी वयातच वाहन चालवले तर तुमचा परवाना रद्द होईल आणि तुम्हाला २५ वर्षांपर्यंत नवीन परवाना मिळणार नाही.

ड्रायव्हिंग लायसन्स काढणे झाले सोपे

नव्या नियमानुसार आता ड्रायव्हिंग लायसन्स काढणे सोपे झाले आहे.आता आरटीमध्ये आपल्याला चाचणी द्यावी लागणार नाही. सरकारने या प्रक्रियेला सोपे बनवले आहे. आता १ जूनपासून ड्रायव्हिंग लायसेन्स टेस्टसाठी आणखी एक पर्याय असणार आहे. १ जूनपासून तुम्ही सरकारद्वारे मान्यताप्राप्त विशेष संस्थेतही ड्रायव्हिंग टेस्ट देऊ शकता. जर तुम्ही लायसेन्स काढणार असालतर हा पर्याय घेऊ शकता. यामुळे आता लायसेन्स काढणे सोपे झाले आहे. 

१६ व्या वर्षीही मिळणार लायसेन्स

जर एखाद्या व्यक्तीचे वय १८ वर्षे पूर्ण झाले असेल तर त्याला ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकते. पण ५० सीसी क्षमतेच्या मोटारसायकलचा परवाना वयाच्या १६ व्या वर्षीही मिळू शकतो. मात्र, हा परवाना १८ वर्षे झाल्यानंतर अपडेट करावा लागेल.

ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता प्राप्त झाल्यापासून २० वर्षे आहे. तुमचे लायसन्स १० वर्षांनी अपडेट करावे लागेल आणि नंतर ४० वयानंतर ५ वर्षांनी अपडेट करावे लागले.

तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता संपल्यावर त्याच दिवशी त्याचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या स्थानिक आरटीओ मध्ये जावे लागेल. 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसcarकार