शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

पंतप्रधान मोदींकडे नागरिकत्वाचे दाखले आहेत का? पीएमओ म्हणतं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 09:41 IST

मोदींकडे नागरिकत्व दाखले आहेत का, असा प्रश्न आरटीआयमधून विचारण्यात आला होता.

नवी दिल्ली: सध्या देशभरात सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी यावरुन वातावरण तापलंय. शाहीन बागेसह अनेक ठिकाणी सीएए आणि एनआरसीविरोधात आंदोलनं सुरू आहेत. एनआरसी लागू झाल्यास नागरिकत्व जाईल, अशी भीती व्यक्त केली जातेय. याच पार्श्वभूमीवर माहिती अधिकाराच्या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे असलेल्या नागरिकत्व दाखल्यांचा तपशील मागण्यात आला होता. मोदींचा जन्म भारतात झाल्यानं त्यांना नागरिकत्व दाखल्यांची आवश्यकता नसल्याचं उत्तर पंतप्रधान कार्यालयानं दिलं आहे.द क्विंट या संकेतस्थळानं दिलेल्या वृत्तानुसार, शुभांकर सरकार यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींच्या नागरिकत्वाबद्दलचा तपशील मागितला होता. त्यावर नागरिकत्व कायदा १९५५ च्या कलम ३ अंतर्गत पंतप्रधान मोदी जन्मानं भारतीय आहेत. त्या आधारे ते भारतीय ठरतात. त्यामुळे त्यांच्या नागरिकत्व दाखल्यांचा प्रश्नच उद्भवत नाही, असं उत्तर पंतप्रधान कार्यालयानं दिलं. नागरिकत्व कायदा १९५५ चं कलम ३ नेमकं काय?नागरिकत्व कायदा १९५५ च्या कलम ३ मध्ये भारतीय नागरिकत्वाचा उल्लेख आहे. यानुसार उपकलम २ सोडून प्रत्येक व्यक्ती भारतीय आहे. त्यामुळे २६ जानेवारी १९५० ते १ जुलै १९८७ दरम्यान भारतात जन्मलेली व्यक्ती भारतीय ठरते. १ जुलै १९८७ पासून नागरिकत्व संशोधन कायदा २००३ लागू होईपर्यंत भारतात जन्मलेली किंवा आई-वडिलांपैकी कोणीही भारतीय असलेली व्यक्ती भारतीय ठरते. नागरिकत्व संशोधन कायदा २००३ लागू झाल्यानंतर मात्र यात थोडा बदल होतो. २००३ नंतर जन्मलेल्या व्यक्तीचे आई-वडील भारतीय असल्यास ती व्यक्ती भारतीय नागरिक ठरते. या व्यक्तीच्या आई-वडिलांपैकी एकही जण अवैध प्रवासी असल्यास ती भारतीय नागरिक ठरत नाही. माहिती अधिकाराच्या माध्यमातून याआधीही पंतप्रधान मोदींबद्दल विविध प्रश्न विचारण्यात आले आहेत. मोदी राजकारणात येण्यापूर्वी रामलीलामध्ये काम करायचे का, मोदी रामलीलामध्ये काम करत होते, तर मग तिथे ते कोणतं पात्र साकारायचे, असे अजब प्रश्न आतापर्यंत माहिती अधिकारातून विचारण्यात आले आहेत. मोदींचा मोबाईल नंबर, त्यांना वर्षाकाठी किती सिलिंडर लागतात, त्याचं बिल उपलब्ध आहे का, असे प्रश्नदेखील पंतप्रधान कार्यालयाला विचारले गेले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या-रोहित पवारांनी केला आदित्य ठाकरेंचा बचाव; आशिष शेलार अन् चंद्रकांत पाटलांना दिलं 'असं' उत्तर...तर तो हिंदूंच्याच हातून मार खाईल; शिवसेनेचा भाजपावर निशाणा India vs New Zealand, 2ndTest: न्यूझीलंडकडून भारताला व्हाईटवॉश; दुसऱ्या कसोटीसह मालिका जिंकलीतुर्कीचा सीरियावर ड्रोन हल्ला, 19 सैनिकांचा मृत्यू

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensएनआरसी