शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चीन, जपानमधून येणाऱ्या प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 11:56 IST

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया, लक्षणे दिसल्यास करणार क्वारंटाइन

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली / गांधीनगर : चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंडमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य असेल, असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी शनिवारी सांगितले. मांडविया यांनी सांगितले की, या देशातून येणाऱ्या कोणत्याही प्रवाशामध्ये कोरोना संसर्गाचे लक्षण दिसून आल्यास त्यांना विलगीकरणात ठेवण्यात येईल. 

चीन, जपान, सिंगापूर आणि थायलंडच्या प्रवाशांवर एअर सुविधा पोर्टलच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे. या देशातून येणाऱ्या प्रवाशांना आपला आरटी-पीसीआर रिपोर्ट अगोदरच अपलोड करावा लागेल. भारतात आल्यानंतर त्यांची थर्मल स्क्रीनिंगही केली जाईल. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन, लाइफ सपोर्ट उपकरणे तयार ठेवा, असे केंद्र सरकारने राज्यांना सांगितले आहे.

७५ टक्के लाेकांनी घेतला नाही बूस्टर डाेस

देशातील ७५ टक्के लाेकांनी काेराेना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डाेस घेतलेला नाही. काेणत्याही राज्यात बूस्टर डाेसचे प्रमाण ५० टक्क्यांच्यावर गेलेले नाही. मात्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि ओडिशामध्ये हे प्रमाण ४० टक्के आहे.

सध्या लॉकडाऊनची गरज नाही

भारताला सध्याच्या कोविड परिस्थितीत आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्याची किंवा लॉकडाऊन लादण्याची आवश्यकता नाही. देशात व्यापक लसीकरण झाले आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्याची वेळ फार कमी रुग्णांवर येईल, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. 

सर्वत्र सतर्कता

- हैदराबाद विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची रॅंडम चाचणी.  - कटरा येथे माता वैष्णाे देवी मंदिरात भाविकांना विना मास्क प्रवेश मिळणार नाही.- लष्करानेही जवानांना काेविड प्राेटाेकाॅलचे पालन करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या.- २७ डिसेंबरला रुग्णालयातील आराेग्य सुविधांचा आढावा घेण्यासाठी माॅक ड्रिल हाेणार.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या