शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

आता तो दिवस दूर नाही, काश्मिरी पंडित लवकरच आपल्या घरी परततील; सरसंघचालक भागवतांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 15:22 IST

भागवत म्हणाले, "मला वाटते, की तो दिवस अगदी जवळ आला आहे, जेव्हा काश्मिरी पंडित आपल्या घरी परत येतील आणि तो दिवस लवकर यावा, अशी माझी इच्छा आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी काश्मिरी पंडित लवकरच खोऱ्यात परततील, असे म्हटले आहे. 1990 च्या दशकात दहशतवाद सुरू झाल्यानंतर घरातून विस्थापित झालेले काश्मिरी पंडित लवकरच खोऱ्यात परततील, अशी आशा भागवत यांनी व्यक्त केली. भागवत यांनी जम्मूमधील नवरेह उत्सवाच्या शेवटच्या दिवशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे काश्मिरी हिंदू समुदायाला संबोधित केले.

भागवत म्हणाले, "मला वाटते, की तो दिवस अगदी जवळ आला आहे, जेव्हा काश्मिरी पंडित आपल्या घरी परत येतील आणि तो दिवस लवकर यावा, अशी माझी इच्छा आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाइल्स'ने काश्मीरी पंडितांचे खरे चित्र आणि 1990 च्या दशकात काश्मीर खोऱ्यातून झालेल्या त्यांच्या पलायनाचा खुलासा केला आहे."

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित, 'द कश्मीर फाइल्स' 11 मार्चरोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला होता. यात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार आणि इतरही काही अभिनेते आहेत. या चित्रपटाने देशात संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. 

'कश्मीरी पंडितांनी आपल्या घरी परतण्याचा संकल्प करावा' - "आज प्रत्येक भारतीयाला काश्मिरी पंडितांच्या पलायनाचे सत्य माहित आहे. आता काश्मिरी पंडितांना अशा प्रकारे त्यांच्या घरी जायचे आहे, की तेथून पुन्हा कधीही पलायनाची वेळ येणार नाही आणि यासाठी हीच खरी वेळ आहे." काश्मिरी पंडितांनी आपल्या घरी परतण्याचा संकल्प करायला हवा. जेणेकरून परिस्थिती लवकर बदलेले. असेही भागवत म्हणाले.

'द कश्मीर फाइल्सने लोकांचे मन हेलावले' -भागवत म्हणाले, "काही लोक चित्रपटाच्या समर्थनार्थ आहेत, तर काही लोक याला अर्धसत्य म्हणत आहेत. मात्र, या चित्रपटाने कटू सत्य जगासमोर आणून लोकांच्या मनाला हादरा दिला आहे, असे देशातील सर्वसामान्य नागरिकांचे मत आहे. एवढेच नाही, तर कुणीही काश्मिरी पंडितांना जाण्यासाठी मजबूर करू शकत नाही. जर कुणी असे करण्याचा प्रयत्न केलाच, तर त्याला परिणाम भोगावे लागतील." 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतThe Kashmir Filesद काश्मीर फाइल्सJammu Kashmirजम्मू-काश्मीर