शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या दर्जाची सुरक्षा, अखेर सरसंघचालक मोहन भागवत यांना कुणापासून धोका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 11:02 IST

केंद्रीय गृह मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन भागवत यांची सुरक्षा झेड प्लसवरून वाढवून अॅडव्हान्स सिक्योरिटी लायजन (ASL) करण्यात आली आहे.

राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांची सुरक्षा वाढवण्यात आली असून त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन भागवत यांची सुरक्षा झेड प्लसवरून वाढवून अॅडव्हान्स सिक्योरिटी लायजन (ASL) करण्यात आली आहे. जी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना आहे.

का वाढवण्यात आली सुरक्षा -मोहन भागवत यांची सुरक्षा वाढवून, पीएम मोदी आणि अमित शाह यांच्या दर्जाची सुरक्षा दिल्यानंतर, अखेर त्यांना कुणापासून धोका आहे? असा प्रश्न उपस्थ होऊ लागला आहे. टीओआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुरक्षेची समीक्षा केल्यानंतर, पंधरवड्यापूर्वीच सुरक्षा वाढविण्याला अंतिम रूप देण्यात आले. मोहन भागवत गैर-भाजप शासित राज्यांच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षेत ढिलाई आढळून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

अखेर मोहन भागवत यांना कुणापासून आहे धोका?सरसंघचालक मोहन भागवत यांच्या झेड प्लस सुरक्षेत सीआयएसएफमधून डेप्युटेशनवर आलेल्या अधिकारी आणि सुरक्षारक्षकांचा समावेश होता. ही सुरक्षा अपग्रेड करून अॅडव्हान्सड सिक्योरिटी लायजन (ASL) करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरसंघचाल कट्टर इस्लामीक संघटनांसह अनेक संघटनांच्या निशाण्यावर आहेत.

सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनाही देण्यात आलीय माहिती -मोहन भागवत यांच्यावरील वाढत्या धोक्यासंदर्भात विविध संस्थांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांना 'एएसएल प्रोटेक्टेड पर्सन' श्रेणीत टाकले आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनाही या अपग्रेडसंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह